शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रिओमध्ये यश मिळविण्यासाठी चांगली सुरुवात महत्त्वाची

By admin | Updated: May 3, 2016 03:49 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केले. आॅलिम्पिकमध्ये

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केले. आॅलिम्पिकमध्ये सलामीच्या लढतीत भारताला आयर्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. श्रीजेश म्हणाला, ‘‘आम्ही एका वेळी एकाच लढतीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. साखळी फेरीत जास्तीत जास्त सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या संघांत अव्वल चारमध्ये स्थान मिळवता येईल.’’श्रीजेश पुढे म्हणाला, ‘‘आयर्लंडविरुद्ध सलामीच्या लढतीत कडवे आव्हान राहील. कारण २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळलेलो नाही. आमची तयारी बघता रिओमध्ये आम्ही अव्वल संघात स्थान मिळवू, अशी आशा आहे.’’संघाच्या तयारीबाबत श्रीजेश म्हणाला, ‘‘सुरुवातीला आमच्याकडून अनेक टाळण्याजोग्या चुका होत होत्या. आता मात्र आम्ही त्यात सुधारणा केली आहे. आम्ही नवी रणनीती आखत असून, तिचा वापर आगामी स्पर्धेत करणार आहोत. आम्ही रोज दोनदा सराव करतो. मी गोलकीपर डेव्ह स्टेनिफोर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सत्रांत सराव करतो. आम्ही सकाळच्या सत्रात पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्टसोबत सराव करतो.’’लंडन आॅलिम्पिकमध्ये १२व्या व अखेरच्या स्थानावर राहिलेला संघाचा सदस्य असलेला श्रीजेश म्हणाला, ‘‘आॅलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्याचे काय महत्त्व आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.’’ (वृत्तसंस्था)