शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पॅरालिम्पिक: ‘गोल्डन बॉय’ सुमितचा विश्वविक्रम; नेमबाजीत अवनीचाही ‘सुवर्णवेध’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 08:21 IST

झांझरिया,कथुनिया यांना रौप्य,सोमवारी जिंकली ५ पदके

टोकियो :  पॅरालिम्पिकमध्ये सोमवारी भारतीय खेळाडूंनी सोमवारी पाच पदकांचा धडाका लावला. सुमित अंतिलने भालाफेकमध्ये  एफ ६४ प्रकारात सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला. प्रथमच सहभागी झालेल्या हरियाणातील सोनिपत येथील २३ वर्षांच्या सुमितने पाचव्या प्रयत्नांत ६८.५५ मीटर लांब भाला फेकून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. २०१५ ला झालेल्या मोटरसायकल अपघातात सुमितने गुडघ्याच्या खालचा पायाचा भाग गमावला होता.

भालाफेकीतच अनुभवी देवेंद्र झांझरियाने एफ ४६ प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. ‘खेलरत्न’ने सन्मानित देवेंद्रचे पॅरालिम्पिकमधील हे तिसरे  पदक ठरले. याच स्पर्धेत भारताचा सुंदरसिंग गुर्जर कांस्य पदकाचा मानकरी ठरला. थाळीफेकीत योगेश कथुनिया याने एफ ५६ प्रकारात रौप्यची कमाई केली. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य अशी सात पदके जिंकली असून पॅरालिम्पिकमध्ये देशाची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. याआधी २००४ च्या अथेन्स आणि २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रत्येकी ४-४ पदकांची कमाई केली होती. आतापर्यंत भारताने १४ पदके जिंकली असून अद्याप अनेक खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे. 

रोख बक्षीसांचा वर्षाव

राजस्थान सरकारने सुवर्ण पदक विजेती अवनीसाठी ३ कोटी, तर रौप्य विजेत्या देवेंद्रसाठी २ कोटी, तसेच सुंदरसाठी १ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. हरयाणा सरकारने सुवर्ण पटकावलेल्या सुमितसाठी ६ कोटी, तर रौप्य विजेत्या योगेशसाठी ४ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

अवनीचा सुवर्णवेध

१९ वर्षीय नेमबाज अवनी लेखराने नेमबाजीत दहा मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी अवनी पहिली भारतीय महिला ठरली. तिने २४९.६ गुणांसह सुवर्ण निश्चित केले. अवनी पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिली होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे, हे विशेष.

थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्य काढून घेतले

पॅरालिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. भारताने आणखी पाच पदके जिंकली असतानाच  थाळीफेकपटू विनोद कुमार याचे कांस्यपदक काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चाहत्यांना धक्का बसला. एफ ५२ प्रकारात ४१ वर्षीय विनोद कुमार थाळीफेकत तिसऱ्या क्रमांकावर होता.  त्याने १९.९१ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई विक्रम रचला.  कुमार यांना झालेला विकार हा पॅरालिम्पिकच्या नियमांमध्ये बसत नसल्याचे सांगत कांस्यपदक काढून घेण्यात आले.

विनोद कुमारच्या मांसपेशी सक्षम असल्याचे आयोजन समितीच्या वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. यानंतर कुमारला पदक नाकारण्यात आले. काल पुरुषांच्या एफ ५२ स्पर्धेत विनोद यांच्या अपंगत्व वर्गीकरणामुळे त्याचे पदक रोखण्यात आले  होते.   एफ ५२ स्पर्धा म्हणजे काय? एफ ५२ ही दिव्यांगांच्या खेळातील या श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश होतो, ज्यांच्या स्नायूंची क्षमता कमी असते, स्नायूंची हालचाल मंद असते, हाताला काहीतरी व्याधी किंवा आजार असतो किंवा पायाच्या लांबीत फरक असतो. या प्रकारातील खेळाडू व्हीलचेअरवर बसून स्पर्धेमध्ये सहभागी होतात.

आमच्या पॅरालिम्पिकपटूंनी देशासाठी पदके जिंकल्याचा आनंद आहे. सुमित, अवनी यांच्या सुवर्णांसह योगेश कथुनिया आणि देवेंद्र झझारिया यांनी रौप्य तसेच सुंदरसिंग गुर्जरने कांस्य जिंकल्याबद्दल अभिनंदन. प्रत्येक भारतीय तुमच्या यशाचा जल्लोष करीत आहे.   

- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

पंतप्रधान मोदी यांचा संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंशी फोनद्वारे संवाद साधला. रौप्य विजेत्या योगेश कथुरियाचे फोनवरुन अभिनंदन केले.  यावेळी मोदी यांनी अवनीलाही शुभेच्छा दिल्या. विजयाचा आम्हाला अभिमान वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. योगेशच्या आईचेही आभार मानले. योगेशनेही पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी देवेंद्र झांझरिया व सुंदर सिंह गुर्जर यांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्रशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ‘तुम्ही महाराणा प्रतापांच्या भूमीतून आहात. तुम्ही भालाफेकीत चांगली कामगिरी करीत आहात’, अशा शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारत