शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ द्या

By admin | Updated: May 6, 2016 05:09 IST

हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने गौरविण्याची मागणी जुनीच आहे. वर्षानुवर्षे ही मागणी केली जात आहे. संसदेपासून मैदानापर्यंत चर्चा रंगते

नवी दिल्ली : हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने गौरविण्याची मागणी जुनीच आहे. वर्षानुवर्षे ही मागणी केली जात आहे. संसदेपासून मैदानापर्यंत चर्चा रंगते; पण ध्यानचंद यांचा सर्वोच्च सन्मान राहून जातो. सचिन तेंडुलकरला हा नागरी सन्मान मिळाला, त्या वेळी ध्यानचंद यांना आधी हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्याची मागणी जोर धरूलागली होती; पण ध्यानचंद तेव्हा देखील दुर्लक्षित राहिले. गुरुवारी राज्यसभेत विविध पक्षाच्या सदस्यांनी हॉकीच्या या सर्वकालीन महान खेळाडूला ‘भारतरत्न’ने गौरविण्याची एकमुखी मागणी केली.समाजवादी पक्षाचे चंद्रपालसिंग यादव यांनी हा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, झाशीत जन्मलेले ध्यानचंद भारतीय हॉकीला सुवर्णयुगात घेऊन गेले. त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ अशी सलग तीन आॅलिम्पिक सुवर्णपदके जिंकून दिली. ४८ सामन्यांत १०९ गोल करण्याचा त्यांचा विक्रम आजही अबाधित आहे. दुसऱ्या राष्ट्रांनी मोठ्या रकमेचे आमिष देत ध्यानचंद यांना कोच बनण्याची वारंवार विनंती केली; पण महान देशभक्त असलेल्या या खेळाडूने कधीही ती आॅफर स्वीकारली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनीदेखील ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. याकडे लक्ष वेधून यादव पुढे म्हणाले, ‘मोदी यांनी स्वत:ची मागणी पूर्ण करण्याची ही योग्य वेळ आहे.’ भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि बिजू जनता दलाचे सदस्य दिलीप तिर्की यांनी यादव यांच्या मागणीला पाठिंबा देत स्मरण दिले की, आधीदेखील दोन्ही सभागृहात वारंवार ही मागणी करण्यात आली. (वृत्तसंस्था)