चार महिन्यांनी पतीशी भेट!

By Admin | Updated: March 28, 2015 01:55 IST2015-03-28T01:55:08+5:302015-03-28T01:55:08+5:30

सिडनीमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात आॅस्टे्रलिया विरुध्द झालेल्या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीने साक्षी धोनीने ‘टष्ट्वीट’ केले की, तुम्ही चांगले लढलात. या संघाचा गर्व आहे.

Four months to visit the husband! | चार महिन्यांनी पतीशी भेट!

चार महिन्यांनी पतीशी भेट!

१ सिडनीमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात आॅस्टे्रलिया विरुध्द झालेल्या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीने साक्षी धोनीने ‘टष्ट्वीट’ केले की, तुम्ही चांगले लढलात. या संघाचा गर्व आहे. तुम्ही काही सामने जिंकता, तर काही सामने हरता. यामध्ये प्रत्येकाने केलेल्या त्यागाचा सहभाग आहे. त्याचवेळी उपांत्य सामन्यातील पराभवानंतर धोनी मायदेशी परतणार असल्याने, अखेर पतीची भेट होण्याची वेळ आली आहे, असेही साक्षीने ‘टष्ट्वीट’ केले आहे.
२महेंद्रसिंग धोनी गेल्या चार महिन्यांपासून टीम इंडियासोबत आॅस्टे्रलिया दौऱ्यावर आहे. दरम्यान या काळात साक्षीने गुडगाव येथील एका रुग्णालयामध्ये ६ फेब्रुवारीला गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र राष्ट्रीय संघाला प्रथम महत्त्व देत धोनीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला नाही. यामुळे त्याला अजूनही प्रत्यक्षात आपल्या मुलीचा चेहरा पाहता आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच साक्षी धोनीने आपल्या मुलीचा पहिला फोटो ‘टष्ट्वीट’रवर शेअर केला होता.
३आॅस्टे्रलया विरुध्द ९५ धावांनी पराभूत झाल्यानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यामुळेच आता धोनी घरी परतणार असल्याने खुश झाल्याने साक्षीने ‘टष्ट्वीट’वर आपली खुशी जाहीर करताना सांगितले की, अखेर पतीशी भेट होण्याची वेळ आली आहे.

 

Web Title: Four months to visit the husband!