शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे भवितव्य गुजरात, दिल्ली, बंगलोरच्या पराभवावर

By admin | Updated: May 17, 2016 01:22 IST

मुंबई संघ १४ गुण मिळवत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. पुढील सामना गुजरात बरोबर आहे. या सामन्यात मुंबईला विजयाबरोबरच धावगती वाढवण्याचं आव्हान असेल.

नामदेव कुंभार
मुंबई, दि. १६ - मुंबई इंडियन्सने मागील लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ८० धावांनी धडाकेबाज विजय मिळवताना नवव्या इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या असल्या तरी इतर संघाच्या पराभवावर त्यांना प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळणार आहे. मुंबई संघ १३ सामन्यात ७ विजय आणि ६ पराभवासह १४ गुण मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. मुंबईचा पुढील सामना बलाढ्य गुजरात लायन्स बरोबर आहे. या सामन्यात मुंबईला विजयाबरोबरच धावगती वाढवण्याचं आव्हान असेल. तर दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आता ११ सामन्यांत १२ गुण झाले असून, तो पाचव्या स्थानी घसरला आहे. दिल्लीचे उर्वरीत ३ सामने पुणे, हैदराबाद आणि बँगलोर बरोबर आहेत. 
 
कोलकाता, मुंबई, गुजरात, दिल्ली, आणि बंगलोर या प्रत्येक संघाला प्लेऑफ मध्ये स्थान पटकावण्याची संधी आहे. कोलकाताचे १२ सामन्यात ७ विजयासह १४ गुण आहेत. त्यांची आगामी लढत गुजरात आणि हैदराबाद संघाबरोबर आहेत. कोलकाताची धावगती + 0.373 अशी चांगली आहे. बंगलोरने १२ सामन्यात ६ विजयासाह १२ गुणांची कमाई केली आहे. त्यांचे उर्वरित सामने दिल्ली आणि पंजाब यांच्या बरोबर आहेत. 
 
हैदराबाद संघाने १२ सामन्यात ८ विजय मिळवत प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले असले तरी त्यांना त्यांचे स्थान अजून पक्के करण्यासाठी एक तरी विजय आवश्यक आहे. कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील त्यांना एक सामना जिंकून स्पर्धेतील आपले आव्हन मजबूत करण्याचा इरादा असेल. आयपीएल ९ च्या सुरवातीलाच धमाकेदार कामगिरी करत आपल्या अभियानाची सुरवात केली होती. पण नंतर त्यांची कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे ते अव्वल स्थानावरुन ५ व्या स्थानी पोहचले. गुजरातने १२ सामन्यात ७ विजयासह १४ गुण मिळवले आहेत. त्यांची पुढील लढत मुंबई आणि कोलकाता बरोबर असणार आहे. 
 
तळाच्या स्थानावर असलेल्या पुणे आणि पंजाबचे प्रत्येकी २ सामने बाकी आहेत. पुणे आणि पंजाब एकमेंकाबरोबर भिडणार आहेत. तर अन्य दुसऱ्या सामन्यात पंजाब बंगलोरबरोबर आणि पुणे दिल्ली बरोबर लढणार आहे. 
पुणे आणि पंजाबने जर दिल्ली आणि बंगलोरला पराभव केले तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपेल आणि मुंबईचे स्थान प्ले ऑफमध्ये फिक्स होईल.
त्यामुळे मुंबईचे पुढील भवितव्य पंजाब आणि पुणे संघाच्या विजयावर असू शकते.