शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

रोमांचक क्रिकेट खेळा ईसीबीचा खेळाडूंना सल्ला

By admin | Updated: March 22, 2017 00:09 IST

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) युवा खेळाडूंना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय संघाचा नवा कसोटी कर्णधार ज्यो रुट

लंडन : इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) युवा खेळाडूंना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय संघाचा नवा कसोटी कर्णधार ज्यो रुट व मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या इयान मॉर्गनला रोमांचक क्रिकेट खेळण्याचा व चमकदार कामगिरी करण्याचा सल्ला दिला आहे. ईसीबीने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या संख्येत वृद्धी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. गेल्या पाच वर्षांत येथील तळागाळातील क्रिकेटच्या स्तरामध्ये विशेष प्रगती झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट संघाची कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे. ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले, ‘‘इंग्लंडचे क्रिकेटपटू व सध्या क्रिकेट संचालक व माजी कर्णधार अ‍ॅण्ड्य्रू स्ट्रॉस यांना आपल्या जबाबदारीची चांगली कल्पना आहे.’’ हॅरिसन म्हणाले, ‘‘अ‍ॅण्ड्य्रू स्ट्रॉस आणि इंग्लंड संघाला साहसी क्रिकेट खेळण्याच्या आपल्या जबाबदारीची चांगली माहिती आहे. खेळाडू मैदानावर जातात त्या वेळी त्यांच्याकडून रोमांचक क्रिकेट खेळण्याची आशा असते. ज्यो रुट व इयान मॉर्गन युवा पिढीला या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी रोमांचक क्रिकेट खेळण्याची जबाबदारी ओळखून आहेत. इंग्लंड संघाला पराभव स्वीकारावा लागला, पण संघाने आव्हानात्मक खेळ केला तर लोकांची प्रतिक्रिया सकारात्मक राहील. पूर्ण विचार करूनच ही रणनीती तयार करण्यात आली आहे. ही रणनीती प्रत्येक वेळी यशस्वी ठरेल, असे नाही, याची आम्हाला कल्पना आहे, पण आपण जर सर्वतोपरी प्रयत्न केला तर एखाद्या वाईट दिवसासाठी आपण माफीसाठी पात्र ठराल.’’(वृत्तसंस्था)