शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड अंतिम फेरीत

By admin | Updated: March 31, 2016 03:15 IST

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा विजयी वारू रोखत अंतिम फेरीत धडक मारली. जेसन रॉयची धडाकेबाज पाऊणशतकी खेळी व बेन स्टोक्सच्या

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा विजयी वारू रोखत अंतिम फेरीत धडक मारली. जेसन रॉयची धडाकेबाज पाऊणशतकी खेळी व बेन स्टोक्सच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने किवींची घोडदौड रोखली. गुरुवारी मुंबईत होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज या संघातील विजेत्यांशी इंग्लंडची किताबी लढत होईल. या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने न्यूझीलंड अंतिम फेरीत स्थान मिळवेल, अशी अटकळ बांधली जात होती. तमाम क्रिकेटप्रेमींचे डोळे नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर लागले होते. नाणेफेक जिंकून इंग्लंडने न्यूझीलंडला फलंदाजीला आमंत्रित करीत २० षटकांत ८ बाद १५३ धावांवर रोखण्याची किमया केली. त्यानंतर या आव्हानाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने जेसन रॉयच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आपला विजयावरील हक्क बळकट केला. रॉयने केवळ ४४ चेंडूंत ७८ धावांची फटकेबाजी करीत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने ११ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने आपली खेळी साजरी केली. रॉय व अ‍ॅलेक्स हेल्स (२०) यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची सलामी दिली. हेल्स मिचेल सेंटनरच्या गोलंदाजीवर कॉलिन मनरोकडे झेल देऊन परतला, तर रॉयला इश सोधीने त्रिफळाबाद केले. पाठोपाठच्या चेंडूवर इयान मॉर्गन (०) पायचित झाला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था १ बाद ८२ वरून ३ बाद ११० अशी झाली. त्यानंतर ज्यो रूटने २२ चेंडूंत नाबाद २७, तर ज्योस बटलरने १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ३२ धावांची खेळी करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)धावफलक : न्यूझीलंड : गुप्तिल झे. बटलर गो. विली १५, विल्यमसन झे. आणि गो. ३२, मनरो झे. अली गो. प्लंकेट ४६, अ‍ॅँडरसन झे. जॉर्डन गो. स्टोक्स २८, टेलर झे. मॉर्गन गो. जॉर्डन ६, राँची झे. विली गो. स्टोक्स ३, इलियट नाबाद ४, सेंटनर झे. जॉर्डन गो. स्टोक्स ७, मॅक्लेनघन धावबाद १. २० षटकांत ८ बाद १५३, बेन स्टोक्स ३/२६, जॉर्डन १/२४. इंग्लंड : जेसन रॉय त्रि. गो. सोधी ७८, हेल्स झे. मनरो गो. सेंटनर २०, ज्यो रुट नाबाद २७, ज्योस बटलर नाबाद ३२, १७.१ षटकांत ३ बाद १५९, इश सोधी २/४२, सेंटनर १/२८.