शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

सलामीच्या लढतीत इंग्लंडचा बांगलादेशवर विजय

By admin | Updated: June 1, 2017 22:54 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंड संघाने बांगलादेशचा आठ विकेटने पराभव केला.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 1 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंड संघाने बांगलादेशचा आठ विकेटने पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले 306 धावांचे आव्हान इंग्लंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात 47.2 षटकांत सहज पार केले. इंग्लंडकडून ज्यो रूटने सर्वाधिक 133* धावा केल्या. रुटने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. अ‍ॅलेक्स हेल्स(95) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (75*) यांनी अर्धशतकी खेळी करत रुटला चांगली साथ दिली. इंग्लंडची पहिली विकेट सहा धावांवर गेल्यानंतर हेल्स आणि रुटने संघाचा मोर्चा संभाळला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 25. 3 षटकात 159 धावांची भागीदारी केली. हेल्सचे शतक थोडक्या हुकले. तो 95 धावांवर बाद झाला. हेल्स बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार मॉर्गनने रुटच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यापूर्वी, इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात सकाळच्या सत्रात चेंडू स्विंग होत असल्याने कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेश संघाने सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतली. तमिम इक्बाल आणि सोम्य सरकार यांनी 12 षटकांत 56 धावांची सलमी दिली. बांगलादेश संघाला चांगली सुरुवात मिळाली असे वाटत असतानाच मैदानावर स्थिरावलेल्या सौम्य सरकाला (28) बेन स्टोक्सने बाद केले. सौम्य सरकार बाद झाल्यानंतर आलेल्या इमरुल केयसला(19) स्थिरावण्यापूर्वी फ्लंकेटने बाद केले. 95 धावांवर बांगलादेशला दुसरा धक्का बसला. पण त्यानंतर तमिम इक्बाल (128) आणि मुशफिकूर रहीम (79) यांनी टिच्चून फलंदाजी केली. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. तमिम इक्बाल आणि मुशफिकूर रहीम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 166 धावांची भागिदारी करत संघाच्या धावसंखेला आकार दिला. 45 व्या षटकात तमिम इक्बाल बाद झाला आणि बांगलादेशच्या धावसंखेला ब्रेक लागला. या षटकात दोन्ही स्थिरावलेले फलंदाज बाद झाल्याने बांगलादेश संघाची धावसंखेला ब्रेक लागला. तमिमनंकतर त्याच षटकात मुशफिकूर बाद झाला. बांगलादेश संघाने 50 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 305 धावा केल्या. इंग्लंडकडून लायम प्लंकेटने 59 धावांत 4 गडी टिपले. बेन स्टोक्स आणि जॅक बॉलने प्रत्येकी 1-1 बळी टिपला