द्रविडने केली विराटची पाठराखण

By Admin | Updated: March 31, 2015 00:02 IST2015-03-31T00:02:05+5:302015-03-31T00:02:05+5:30

आॅस्ट्रेलियाविरुद्ध विश्वकप स्पर्धेत महत्त्वाच्या उपांत्य लढतीत निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या विराट कोहलीची माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने पाठराखण केली आहे.

Dravid has helped Virat's side | द्रविडने केली विराटची पाठराखण

द्रविडने केली विराटची पाठराखण

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाविरुद्ध विश्वकप स्पर्धेत महत्त्वाच्या उपांत्य लढतीत निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या विराट कोहलीची माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने पाठराखण केली आहे.
द्रविड म्हणाला, ‘‘आपल्याला विस्मरण झाले आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. त्याची कामगिरी शानदार होती. यापूर्वी एकाही भारतीय फलंदाजाला कसोटी मालिकेत विराटप्रमाणे छाप सोडता आलेली नाही. विराटने त्या मालिकेत सर्वोत्तम कामगिरी केली. दुर्र्दैवाने उपांत्य फेरीच्या लढतीत त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, हा खेळाचा एक भाग आहे.’’
द्रविडने भारतीय संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. भारतीय संघाने कसोटी व तिरंगी मालिकेदरम्यान चांगली कामगिरी केली नसली तरी विश्वकप स्पर्धेत नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करीत उपांत्य फेरीपर्यंत स्थान मिळवले, असेही द्रविड म्हणाला. स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, असेही त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Dravid has helped Virat's side