जोकोविच आऊट

By Admin | Updated: October 16, 2016 02:54 IST2016-10-16T02:54:32+5:302016-10-16T02:54:32+5:30

जगातील नंबर वन टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला शांघाय ओपनमधून गाशा गुंंडाळावा लागला आहे. शनिवारी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनच्या

Djokovic out | जोकोविच आऊट

जोकोविच आऊट

शांघाय : जगातील नंबर वन टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला शांघाय ओपनमधून गाशा गुंंडाळावा लागला आहे. शनिवारी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनच्या रॉबर्टो बॅटिस्टा अगुतने त्याला ४-६, ४-६ असे पराभूत केले.
बारा वेळचा ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या आणि तीन वेळा शांघाय ओपन स्पर्धा जिंकलेला जोकोविच या सामन्यात आपल्या लयीत दिसला नाही. १५ व्या मानांकित रॉबर्टोविरुद्ध त्याने २९ चुका केल्या आणि ९ ब्रेकपॉर्इंटमधून केवळ दोनच संधी साधल्या.
जोकोविचने तीन मॅच पार्इंट वाचवले. परंतु रॉबर्टोने चौथ्यांदा जोकोविचची सर्व्हिस तोडून एक तास ४८ मिनिटे चाललेला हा सामना आपल्या नावावर केला. आता स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी द्वितीय मानांकित ब्रिटनच्या अँडी मरेशी रॉबर्टोला लढावे लागणार आहे. मरेने दुसऱ्या उपांत्य सामन्यात फ्रान्सच्या जॉईल्स सिमोनला ६-४, ६-३ असे हरवून अंतिम फेरी गाठली आहे.

Web Title: Djokovic out