शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्कच्या पहिल्याच षटकाने दिशा निश्चित झाली

By admin | Updated: March 29, 2015 23:54 IST

मोक्याच्या क्षणी काही संघ, काही खेळाडू कामगिरीचा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरतात. काही संघ व खेळाडू मात्र त्यात अपयशी ठरतात

मोक्याच्या क्षणी काही संघ, काही खेळाडू कामगिरीचा स्तर उंचावण्यात यशस्वी ठरतात. काही संघ व खेळाडू मात्र त्यात अपयशी ठरतात. चॅम्पियन्स व चॅलेंजर्स यांच्या दरम्यान हाच मुख्य फरक असतो. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड संघांदरम्यान रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान याची प्रचिती आली. आॅस्ट्रेलिया संघ या लढतीत शिकाऱ्याप्रमाणे भासला. मिशेल स्टार्कचे पहिले षटक सर्व काही स्पष्ट करणारे होते. वेग, स्विंग आणि नियंत्रण याचा अचूक मेळ साधत स्टार्कने ब्रेन्डन मॅक्युलमचा त्रिफळा उडवला. त्या वेळीच विश्वकप विजेता निश्चित झाला. त्याच वेळी सर्व काही घडले, असे सांगता येत नसले तरी त्याचा प्रभाव मात्र निश्चितच पडला. त्यानंतर न्यूझीलंडने संघर्ष केला, पण पॉवर प्लेमध्ये जेम्स फॉकनरच्या पहिल्याच षटकात विश्वविजेतेपद निश्चित झाले. मोक्याच्या क्षणी कामगिरीचा दर्जा उंचावणाऱ्या आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या यादीत फॉकनरने स्थान पक्के केले. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आॅस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी पसंती दर्शविण्यात येत होती आणि अंतिम सामना प्रारंभ होण्यापूर्वीही ती कायम होती. काही संघ अशी प्रतिमा जपण्यात यशस्वी ठरतात. न्यूझीलंड संघ अंडरडॉग्ज होता आणि अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे कामगिरीचा दर्जा उंचावण्यासोबत प्रतिस्पर्धी संघासोबत तुल्यबळ लढत देण्याचे आव्हान होते. मोक्याच्या क्षणी मात्र न्यूझीलंडला कामगिरीचा दर्जा उंचावण्यात अपयशी ठरला. गुप्तिल, अ‍ॅण्डरसन आणि रोंची यांच्या बाद होण्यामुळे ते स्पष्ट झाले. प्रत्युत्तरात खेळताना फिंचला लवकरच गमावल्यानंतर स्मिथ व वॉर्नर यांनी विश्वविजेत्याच्या थाटात खेळ केला. सर्वोत्तम संघाने विजय मिळविला. न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अंतिम फेरीपर्यंत आक्रमक क्रिकेट खेळले. पण, या विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम बाब म्हणजे दोन नवे चेंडू आणि मोठ्या बॅटदरम्यानच्या लढतीत मैदाने लहान असली, तरी गोलंदाजांनी फलंदाजांना पिछाडीवर सोडल्याचे निदर्शनास येते. जर तुमच्याकडे स्टार्क किंवा बोल्टप्रमाणे स्विंग, वहाब रियाज किंवा मोर्ने मोर्केलप्रमाणे वेग, इम्रान ताहिर किंवा डॅनियल व्हेटोरी किंवा रविचंद्रन अश्विन यांच्याप्रमाणे चेंडू वळवण्याची क्षमता असेल, तर निश्चितच फलंदाजांवर वर्चस्व गाजवता येते. भारतीय संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना खरंच चांगली कामगिरी केली आहे. अनेक खेळाडूंच्या वयाचा विचार करता या स्पर्धेमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. वन-डे क्रिकेटमध्ये गोलंदाज कामगिरीत सातत्य राखतील, अशी आशा आहे. गोलंदाजीमुळे उभय संघांतील फरक स्पष्ट होतो. विश्वकप स्पर्धेतून हा संदेश मिळाला असून, भारतासाठी हा महत्त्वाचा संदेश आहे. (टीसीएम)