शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचा 27 धावांनी कोलकातावर विजय

By admin | Updated: April 30, 2016 19:41 IST

दिल्ली डेअरडेव्हिल्सने शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 30 - दिल्ली डेअरडेव्हिल्सने शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव झाला आहे. संयमी सुरुवात करणारी कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकेल असं वाटत होतं. पण शेवटच्या 10 बॉलमध्ये 5 विकेट्स काढत दिल्ली डेअरडेव्हिल्सने विजयावर शिक्कामोर्तब करुन टाकलं. दिल्लीने 18.3 ओव्हर्समध्येच कोलकाताचा संघ ऑल आऊट करुन टाकला.
 
दिल्लीने कोलकातासमोर 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कोलकाताने संयमी सुरुवात केली होती. रॉबिन उथप्पादेखील उत्तम खेळत होता. त्याने 72 धावा केल्या. मात्र शेवटच्या ओव्हर्समध्ये संघाला गरज असताना त्याने विकेट टाकली. कोलकाता नाईट रायडर्सची खालची फळी पुर्णपणे फेल गेल्याने कोलकाताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.16व्या ओव्हरला 151 वर 6 विकेट असलेली धावसंख्या 18 व्या ओव्हरच्या तिस-या बॉलला ऑल आऊट 159 होती. झहीर खान आणि ब्रॅथवेटने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
 
कोलकाता  नाईट रायडर्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताच्या गोलंदाजांनी निर्णय योग्य ठरवत पहिल्याच ओव्हरमध्ये रुसेलने दिल्लीच्या दोन विकेट्स काढल्या होत्या. श्रेयस अय्यर आणि कॉक यांना पहिल्याच ओव्हरमध्ये रुसेलने तंबूत परत पाठवलं. दोन धावांवर दोन विकेट अशी दिल्लीची परिस्थिती झाली होती. पण चौथ्या विकेटसाठी करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने केलेल्या पार्टनरशिपमुळे दिल्लीचा संघ सावरला.
 
करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने 105 धावांची पार्टनरशिप केली. दिल्ली संघाची चौथ्या विकेटसाठी ही रेकॉर्ड पार्टनरशिप झाली आहे. करुण नायरने 50 चेंडूत 68 धावा केल्या तर सॅम बिलिंग्सने 34 चेंडूत 54 धावा केल्या. दिल्लीकडून रुसेल आणि उमेश यादवने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.