शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली पुन्हा ‘अनलकी’

By admin | Updated: April 13, 2015 03:47 IST

दीपक हुड्डाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या आठव्या पर्वात रविवारी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत

नवी दिल्ली : दीपक हुड्डाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या आठव्या पर्वात रविवारी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ३ गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने दिल्ली संघावरील वर्चस्व कायम राखले. दिल्ली डेअरडेव्हिल्सने ३ बाद १८४ धावांची दमदार मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना दीपक हुड्डा (२५ चेंडू, ५४ धावा) व अजिंक्य रहाणे (४७) यांनी उल्लेखनीय योगदान देत राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला. इम्रान ताहिर (४-२८) व अमित मिश्रा (२-३२) यांच्या अचूक माऱ्यानंतरही डेअरडेव्हिल्स संघाला पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यात अपयश आले. राजस्थान रॉयल्सला अखेरच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज होती. टीम साऊदीने (नाबाद ७) अखेच्या चेंडूवर चौकार ठोकत राजस्थानला संस्मरणीय विजय मिळवून दिला. क्रिस मॉरिसने (नाबाद १३) चौकार ठोकत राजस्थानच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज असताना साऊदीने चौकार ठोकला. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा आयपीएल स्पर्धेतील हा सलग ११ वा पराभव ठरला. सलग पराभव स्वीकारण्याच्या बाबतीत डेअरडेव्हिलने आज पुणे वॉरियर्स संघाच्या कामगिरीची बरोबरी केली. रहाणेने आज सावधगिरी व आक्रमकता याचा अचूक मेळ साधला. सुरुवातीला रहाणेने जयदेव उनाडकट व नॅथन कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर षटकार वसूल केले. संजू सॅम्सन (११) व कर्णधार स्टीव्हन स्मिथ (१०), करण नायर (२०) व स्टुअर्ट बिन्नी (१) यांना मोठी खेळी करता आली नाही.त्याआधी, आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ३ बाद १८४ धावांची दमदार मजल मारली. मयंक अग्रवाल (३७ धावा, २१ चेंडू),श्रेयस अय्यर (४० धावा, ३० चेंडू), कर्णधार जेपी ड्युमिनी (नाबाद ४४ धावा, ३८ चेंडू) आणि अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (नाबाद २७ धावा, १४ चेंडू) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. डेअरडेव्हिल्सने अखेरच्या तीन षटकांत ४३ धावा वसूल केल्या. शेन वॉटसन अद्याप फिट नसल्यामुळे स्टिव्हन स्मिथला पुन्हा एकदा नाणेफेकीसाठी मैदानात उतरावे लागले. स्मिथने नाणेफेकीचा कौल मिळवत डेअरडेव्हिल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. डेअरडेव्हिल्सतर्फे श्रेयस अय्यर व अग्रवाल यांनी सलामीला ४५ धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यात अग्रवालचे योगदान ३७ धावांचे होते. अग्रवालच्या खेळीत ६ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. स्मिथला पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात फिरकीपटू प्रवीण तांबेकडे चेंडू सोपवावा लागला. तांबेने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना अग्रवालला माघारी परतवले व राजस्थान संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अय्यरने जेम्स फॉल्कनर, तांबे व ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत धावगतीला वेग दिला. अय्यरचा अडथळा मॉरिसने दूर केला. अय्यरने तीन चौकार व तीन षटकार ठोकले. तामिळनाडू सरकारच्या नीतीमुळे गेल्या लढतीला मुकलेल्या मॅथ्यूजने आज चमकदार कामगिरी केली. त्याने फॉल्कनरला लक्ष्य करीत दोन चौकार वसूल केले आणि त्यानंतर ‘काऊ कॉर्नर’ला षटकार ठोकला. महागडा ठरलेल्या फॉल्कनरने चार षटकांत ५५ धावा बहाल केल्या. मॉरिसने ४ षटकांत ३५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. ड्युमिनीने अखेरच्या षटकात दोन षटकार ठोकले. (वृत्तसंस्था)