शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

द.आफ्रिका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, अरविंद, गुरकिरतला संधी

By admin | Updated: September 20, 2015 13:57 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी - २० मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून कर्नाटकचा गोलंदाज एस. अरविंद, गुरकिरत मान या नवीन चेह-यांना संधी देण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

बेंगळुरु, दि. २० - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी - २० मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून कर्नाटकचा गोलंदाज एस. अरविंद (टी -२० मालिकेसाठी) आणि गुरकिरत मान (वन डे मालिकेसाठी) या नव्या चेह-यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. 

रविवारी बेंगळुरुत बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक पार पडली. सप्टेंबर अखेरीस दक्षिण आफ्रिका संघ भारत दौ-यावर येत असून यात टी - २०, एकदिवसीय व कसोटी मालिका परडणार आहे. टी -२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी बेंगळुरुतील बैठक संघाची निवड करण्यात आली. पुढील वर्षी टी -२० वर्ल्डकप होणार असल्याने टी - २० मालिकेतील संघाची निवड ही महत्त्वाची मानली जात आहे. कर्नाटकचा गोलंदाज एस. अरविंदला टी -२० मालिकेतील भारतीय संघात जागा मिळाली आहे. तर पंजाबचा फलंदाज गुरकिरत मानला एकदिवसीय मालिकेच्या भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. टी - २० मालिकेत हरभजन सिंग व अमित शर्मा या दोघा फिरकीपटूंचाही समावेश करण्यात आला आहे. पाच पैकी तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आज संघ निवडण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. वन डे व टी -२० मालिकेत कर्णधारपदाची धूरा महेंद्रसिंग धोनीकडेच राहील असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

 

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाटी रायडू, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, अक्षर पटेल, गुरकिरत मान, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, उमेश यादव

टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाटी रायडू, महेंद्रसिंह धोनी, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, अक्षर पटेल, हरभजन सिंग, मोहित शर्मा, अमित मिश्रा, एस. अरविंद