शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाखेर ऑस्ट्रेलिया ४ बाद २२१

By admin | Updated: December 18, 2014 13:50 IST

भारताच्या ४०८ धावांचा पाठलाग करताना दुस-या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून २२१ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 

ब्रिस्बेन, दि. १८ -  भारताच्या ४०८ धावांचा पाठलाग करताना दुस-या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून २२१ धावा केल्या आहेत. अंधुक प्रकाशामुळे दुस-या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला असून स्टीव्ह स्मिथ (६५) व मायकेल मार्श (७ ) खेळत आहेत. 

पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शानदार शतके झळकावणा-या डेव्हिड वॉर्नरला दुस-या कसोटीत मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही. २९ धावांवर खेळत असताना तो यादवच्या चेंडूवर बाद झाला तर ख्रिस रॉॉर्स ५५ आणि वॉटसन २५ व शॉन मार्श ३२ धावांवर बाद झाले. भारतातर्फे यादवने ३ तर अश्विनने १ बळी टिपला.

तत्पूर्वी जोश हेजलवूडच्या तेजतर्रार मा-यामुळे भारताचा पहिला डाव ४०८ धावांवर संपुष्टात आला. दमदार सुरुवातीनंतरही दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताला भक्कम आघाडी घेण्यात फारसे यश आले नाही. 

ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर मुरली विजयच्या १४४ धावा आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद ७१ धावांच्या खेळीने भारताने ४ गडी गमावत ३११ धावा केल्या होत्या. दुस-या दिवशी भारत धावांचा डोंगर उभारुन ऑस्ट्रेलियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल अशी आशा होती. मात्र जोश हेजलवुडचा अचूक मारा, बाऊन्सरचा वापर आणि स्विंगमुळे भारताच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. दुस-या दिवसाला सुरुवात होताच हेजलवूडने अजिंक्य रहाणेला ८१ धावांवर बाद करत सर्वात मोठा अडसर दूर केला. त्यापाठोपाठ वॉटसनने रोहित शर्माला ३२ धावांवर बाद केले. महेंद्रसिंह धोनी आणि आऱ. अश्विनने ५२ धावांची भागीदारी केली. मात्र हेजलवूडने या दोघांचाही अडसर दूर केला. यानंतर तळाचे फलंदाजही झटपट तंबूत परतले आणि भारताचा पहिला डाव ४०८ धावांवर संपुष्टात आला.