शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकन गोलंदाज इरंगाविरुद्ध सदोष गोलंदाजी शैलीसाठी तक्रार

By admin | Updated: June 1, 2016 03:34 IST

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज शमिंडा इरंगाविरुद्ध९ सदोष गोलंदाजी शैलीसाठी तक्रार करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी याची माहिती दिली

चेस्टर ली स्ट्रीट : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज शमिंडा इरंगाविरुद्ध९ सदोष गोलंदाजी शैलीसाठी तक्रार करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी याची माहिती दिली. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावणाऱ्या श्रीलंका संघासाठी हा आणखी एक धक्का आहे.या २९ वर्षीय गोलंदाजाच्या शैलीची तक्रार दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर करण्यात आली. सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ९ गडी राखून विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आयसीसीने स्पष्ट केले, की सामनाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात या २९ वर्षीय गोलंदाजाच्या शैलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हा अहवाल श्रीलंका संघव्यवस्थापनाकडे सोपविण्यात आला आहे.इरंगाने पहिल्या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने २७ षटकांत १०० धावा बहाल केल्या. त्याला बळी घेता आला नाही. दुसऱ्या डावात त्याने केवळ एक षटक टाकले. आयसीसीच्या नियमानुसार इरंगाला आता आगामी १४ दिवसांमध्ये आपल्या गोलंदाजी शैलीची चाचणी द्यावी लागेल. चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे ९ जूपासून लॉर्ड््समध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध राहील; पण त्यानंतर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत त्याला खेळता येणार नाही. इरंगाने आतापर्यंत १८ कसोटी सामने खेळले असून, ५३ बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)