शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गणोशने भरले आनंदाचे रंग

By admin | Updated: July 26, 2014 01:06 IST

गणोश माळी याने आपल्या कर्तृत्वाचा ङोंडा त्रिखंडात फडकवून बिल्डिंग पेंटर असलेल्या वडील चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले;

गणपती कोळी - कुरुंदवाड
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील गणोश माळी याने आपल्या कर्तृत्वाचा ङोंडा त्रिखंडात फडकवून बिल्डिंग पेंटर असलेल्या वडील चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले; तर पोरांचं स्वप्न साकार होण्यासाठी दुस:याच्या शेतात बांध खुरपणा:या आई अनिता यांच्या हातात यशाचे क्षितिज आणून दिले; पण आपल्या मुलाने केलेला पराक्रम त्यांच्या गावीही नव्हता. आज, शुक्रवारी पहाटे 3 वाजता गणोश माळीने कांस्यपदक मिळविले. आज सकाळी ही वार्ता कुरुंदवाड आणि परिसरात पसरताच गणोशच्या आई-वडिलांचे अभिनंदन करायला नागरिकांनी गर्दी केली. मात्र, चंद्रकांत माळी आजही पेंटिंगसाठी, तर आई मोलमजुरीसाठी बाहेर गेल्या होत्या.
कुरुंदवाड येथे दोन खोल्यांच्या साध्या कौलारू घरात माळी कुटुंब वास्तव्यास आहे. चंद्रकांत हे बिल्डिंग पेंटर म्हणून मजुरीवर काम करतात, तर आई अनिता या दुस:याच्या शेतात खुरपणी करतात. गणोश हा त्यांचा एकुलता एक मुलगा असला तरी व्यायामासाठी त्याला सवड देणो आणि त्याच्या खुराकावर पैसा खर्च करण्याइतकी त्यांची श्रीमंती नाही मात्र मनाची श्रीमंती अफाट. 
त्यांनी गणोशला त्याची व्यायामाची आवड जोपासण्यासाठी आणखी कष्ट करायचे ठरविले. वयाच्या 12व्या वर्षी तो हक्र्युलस जिममध्ये दाखल झाला. प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी त्याची आवड आणि चुणूक हेरली. त्यांनी त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता तयार करण्याचे ठरविले. साधारण वर्षभरापूर्वी तो हवाईदलामध्ये भरती झाला आणि त्यांच्या पंखांना नवीन बळ मिळाले. गणोशनेही प्रशिक्षकांचा विश्वास न तोडता परिश्रम केले आणि त्याचे फळ त्याला कांस्यपदकाच्या रूपाने मिळाले.
आज गणोशने राष्ट्रकुल स्पर्धा गाजविली. आता तो आशियाई स्पर्धेत खेळेल; पण त्याचे अंतिम लक्ष्य अर्थातच ऑलिम्पिक असणार आहे. 2020च्या टोकिओ ऑलिम्पिकसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्याचे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून त्याच्या हातून देशाचे नाव मोठे व्हावे, ही त्याच्या आईवडिलांची अपेक्षा आहे, त्यासाठी आणखी  कष्ट करावयास ते तयार आहेत.