प्रशिक्षक महिला फुटबॉलपटूंच्या रुममध्ये रात्र घालवायचे - सोना चौधरी

By Admin | Updated: May 12, 2016 15:08 IST2016-05-12T14:37:44+5:302016-05-12T15:08:04+5:30

भारताच्या महिला फुटबॉल संघातील खेळाडूंचे लैंगिक शोषण व्हायचे असा आरोप भारताच्या महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार सोना चौधरीने केला आहे.

The coach should spend the night in the women's room - Sona Chaudhary | प्रशिक्षक महिला फुटबॉलपटूंच्या रुममध्ये रात्र घालवायचे - सोना चौधरी

प्रशिक्षक महिला फुटबॉलपटूंच्या रुममध्ये रात्र घालवायचे - सोना चौधरी

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १२ - भारताच्या महिला फुटबॉल संघातील खेळाडूंचे लैंगिक शोषण व्हायचे. संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि सचिव याला जबाबदार होते असा धक्कादायक आरोप भारताच्या महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार सोना चौधरीने केला आहे. सोन चौधरीने तिच्या 'गेम इन गेम' या नव्या पुस्तकातून हे धक्कादायक खुलासे केले आहेत. 
 
नुकतेच वाराणसीमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मूळची हरयाणाची असणारी सोना चौधरी नव्वदच्या दशकात भारतीय महिला फुटबॉल संघातून खेळायची. १९९५ साली तिला महिला फुटबॉल संघाचे कर्णधार बनवण्यात आले. मी भारतीय फुटबॉल संघामधून खेळायचे तो महिला फुटबॉलपटूंसाठी वाईट काळ होता. संघात स्थान मिळवण्यासाठी प्रशिक्षक आणि सचिव महिला खेळाडूंना तडजोड करण्यासाठी जबरदस्ती करायचे. 
 
परदेश दौ-यांवर प्रशिक्षक आणि सचिव  त्यांच्या रात्री महिला खेळाडूंच्या रुममध्ये घालवायचे. महिला खेळाडूंनी याला विरोध करुनही हे सुरुच होते. राष्ट्रीय नव्हे राज्य पातळीवरही महिला खेळाडूंचा असाच छळ व्हायचा. लैंगिक सुखासाठी महिला खेळाडूंना त्रास दिला जायचा. त्याबदल्यात त्यांना संघात स्थान दिले जायचे. 
 
१९९४ साली हरयाणाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर सोना चौधरीने उत्तरप्रदेशकडून खेळायला सुरुवात केली. १९९८ साली आशियाई स्पर्धेच्यावेळी गुडघ्याला आणि पाठिची दुखापत झाल्यानंतर सोना चौधरीची फुटबॉलमधील कारर्कीद संपुष्टात आली. 
 

Web Title: The coach should spend the night in the women's room - Sona Chaudhary