सरदार सिंगला पोलिसांकडून क्लीन चिट

By Admin | Updated: May 12, 2016 02:52 IST2016-05-12T02:52:55+5:302016-05-12T02:52:55+5:30

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याला लैंगिक शोषणप्रकरणी पंजाब पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली आहे. सरदारवर तीन महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता

Clean Chit from Sardar Singh Police | सरदार सिंगला पोलिसांकडून क्लीन चिट

सरदार सिंगला पोलिसांकडून क्लीन चिट

चंदीगड : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याला लैंगिक शोषणप्रकरणी पंजाब पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली आहे. सरदारवर तीन महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता.
याप्रकरणी पंजाबच्या लुधियाना पोलिसांनी सांगितले, की तपासादरम्यान सरदारवर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. लुधियाना पोलीस आयुक्तांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष तपास संघाकडून होत असलेल्या तपासादरम्यान ब्रिटनच्या महिलेने लावलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे सरदारवर आरोप करणारी महिला स्वत: आंतरराष्ट्रीय हॉकी खेळली असून तिच्यासोबत सरदारचे लग्नही ठरले होते.

Web Title: Clean Chit from Sardar Singh Police