शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

केर्बरला नमवून सिबुलकोवा चॅम्पियन

By admin | Updated: November 1, 2016 02:06 IST

विश्व क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अँजेलिक केर्बर हिच्यावर सलग सेटमध्ये ६-३, ६-४ ने विजय साजरा करीत मोसमातील अखेरची डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली.

सिंगापूर : स्लोव्हाकियाची डोमिनिका सिबुलकोवा हिने शानदार कामगिरीसह विश्व क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अँजेलिक केर्बर हिच्यावर सलग सेटमध्ये ६-३, ६-४ ने विजय साजरा करीत मोसमातील अखेरची डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली.२०१४ ची आॅस्ट्रेलियन ओपनची उपविजेता सिबुलकोवा आठवडाभरापूर्वी राऊंड रॉबिन सामन्यात केर्बरकडून पराभूत झाली होती. सिंगापूरमध्ये पराभवाची परतफेड करीत महिला एकेरीचे जेतेपद पटकविले. यंदा आॅस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम जिंकताच अमेरिकेची सेरेना विलियम्स हिला मागे टाकून केर्बर विश्व क्रमवारीत नंबर वन बनली होती. केर्बरला डब्ल्यूटीए जेतेपदाची देखील प्रबळ दावेदार समजले जात होते. पण अंतिम सामन्यात २८ वर्र्षांच्या सिबुलकोवाला रोखण्यात तिला अपयश आले.राऊंड रॉबिन फेरीत सुरुवातीचे दोन्ही सामने गमविणाऱ्या स्लोव्हाकियाच्या सिबुलकोवाने नंतर तिन्ही सामने जिंकून ज्यो किंग ट्रॉफीसोबत २०.५ लाख डॉलरची रक्कम जिंकली. या कामगिरीसाठी सिबुलकोवाला ‘डब्ल्यूटीए कमबॅक प्लेअर आॅफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवडण्यात आले. महिला दुहेरीत आॅलिम्पिक चॅम्पियन जोडी रशियाची एकातेरिना माकारोवा- एलिना व्हेस्रिना यांनी अमेरिकन ओपन विजेती जोडी बेथानी माटेक सॅन्डस्- ल्यूसी सफारोवा या जोडीवर ७-५, ६-३ असा विजय नोंदवित जेतेपदाचा मान मिळविला.(वृत्तसंस्था)