शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

चायना ओपन बॅडमिंटन: पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:54 PM

सात्त्विक दुहेरीच्या दोन्ही सामन्यात पराभूत

चांग्झू(चीन) : विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधू हिचे चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेआहे. गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व लढतीत सिंधूला थायलंडची पोर्नपावी चोचुवोंगविरुद्ध तीन गेमपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक संघर्षात पराभव पत्करावा लागला. आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूने पहिला गेम जिंकल्यानंतरही ५८ मिनिटात पोर्नपावीकडून २१-१२, १३-२१, १९-२१ ने पराभूत व्हावे लागले.सिंधूचा पोर्नपावाविरुद्ध चार सामन्यात हा पहिला पराभव होता. सामन्यात तिने चांगली सुरुवात करीत ब्रेकपर्यंत थायलंडच्या प्रतिस्पर्धीविरुद्ध १९-१० ने गेम जिंकला. दुसऱ्या आणि तिसºया गेममध्ये सिंधू लय कायम राखू शकली नाही. अखेरच्या गेममध्ये सलग सहा गुणांची कमाई करीत पोर्नपावीने गेम आणि सामना जिंकला.दुहेरी गटात सात्त्विक साईराज रंकीरेड्डी हा पुरुष आणि मिश्र दुहेरीत पराभूत झाला. पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानी असलेल सात्त्विक- चिराग शेट्टी हे जपानचे चौथे मानांकित ताकेशी कामुरा- केइगो सोनोदा यांच्याकडून ३३ मिनिटात १९-२१, ८-२१ ने पराभूत झाले. याआधी जुलै महिन्यात जपान ओपनदरम्यानही भारतीय जोडीला याच जोडीकडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते. यानंतर मिश्र दुहेरीतही अश्वनी पोनप्पासोबत खेळणारा सात्त्विक यूकी केनेको आणि मिसाकी मात्सुतोमो या जपानच्या जोडीकडून ११-२१, २१-१६, १२-२१ ने पराभूत झाला.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton