शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयच्या करारांची तपासणी

By admin | Updated: May 18, 2016 05:21 IST

कोणताही करार झाल्यानंतर तो नोंदणी व मुद्रांक विभागाकडे नोंदविणे आणि त्यापोटी मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक आहे.

राहुल कलाल,

पुणे-कोणताही करार झाल्यानंतर तो नोंदणी व मुद्रांक विभागाकडे नोंदविणे आणि त्यापोटी मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) क्रिकेट स्पर्धांसाठी खेळाडूंबरोबर केलेले करार नोंदवित नसल्याने राज्य शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. तो वसूल करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग बीसीसीआयच्या कार्यालयांवर लवकरच छापे टाकणार असून, कागदपत्रांची कसून तपासणी करणार आहे. बीसीसीआय खेळाडूंना मानधन देण्यासाठी करार करते. सामने महाराष्ट्रात झाले तर करार नोंदणी व मुद्रांक विभागाकडे नोंदविणे बंधनकारक असते. मात्र, आतापर्यंत एकदाही बीसीसीआयने कराराची नोंद केलेली नाही. तसेच इंडियन प्रिमिअर लीगचेही (आयपीएल) आहे.गेल्या काही वर्षांत आयपीएलला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे भारतासह परदेशांमधील खेळाडूंना आयपीएलचे संघ कोट्यवधी रुपये देऊन, त्या हंगामात खेळण्यासाठी विकत घेतात. त्याचे करारही केले जातात. मात्र हे करारही नोंदणी व मुद्रांक विभागाकडे नोंदविले जात नाहीत. करार नोंदणीअभावी बुडणारा हा महसूल मिळविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग आता पुढे सरसावला आहे. या विभागाला आत्तापर्यंत कोणत्याही कार्यालयावर धाडी टाकून त्यांची तपासणी करणे, कागदपत्रे जप्त करणे आदी अधिकार नव्हते. मात्र एप्रिल २०१५ मध्ये कायद्यात यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी संशयित कार्यालयावर छापे टाकून तपासणी करू शकणार आहेत. छापे टाकल्या जाणाऱ्या संस्थांच्या यादीत पहिला क्रमांक बीसीसीआयचा आहे. याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक एन. रामास्वामी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नोंदणी व मुद्रांक विभागाने बीसीसीआयला आतापर्यंत तीन वेळा नोटिसा पाठविल्या आणि त्यांच्याकडून करण्यात आलेल्या करारांची कागदपत्रे देण्यास सांगितले. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. आणखी एकदा बीसीआयकडे याची विचारणा करण्यात येणार आहे. त्यानंतर विभागाकडून बीसीसीआयच्या कार्यालयांची तपासणी करण्यात येणार आहे. याचे नियोजन सुरू आहे. कागदपत्रे जप्त करणे आता शक्यबीसीसीआय खेळाडूंबरोबर करीत असलेल्या कराराच्या नोंदी नोंदणी व मुद्रांक विभागाकडे करीत नाही. अशीच स्थिती अनेक कंपन्यांचीही आहे. तेही अनेक करार करतात मात्र त्याच्या नोंदी करीत नाहीत. मात्र आतापर्यंत नोंदणी व मुद्रांक विभाग अशांच्या कार्यालयांची तपासणी करू शकत नव्हते आणि कागदपत्रे जप्त करू शकत नव्हते. त्यासाठी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता नोंदणी व मुद्रांक विभाग कोणत्याही कार्यालयात थेट तपासणी करून कागदपत्रे जप्त करू शकणार आहे. त्याच आधारावर बीसीसीआयच्या कार्यालयांचीही तपासणी करण्यात येईल.एन. रामास्वामी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक