शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातला ३१२ धावांचे आव्हान

By admin | Updated: January 14, 2017 01:25 IST

दुसऱ्या डावात बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४११ धावांची मजल मारून

इंदूर : दुसऱ्या डावात बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४११ धावांची मजल मारून गुजरातला विजयासाठी ३१२ धावांचे कठीण आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर गुजरातने बिनबाद ४७ अशी सुरुवात केली. चौथ्या दिवशी ३ बाद २०८ धावसंख्येवरून सुरुवात करताना मुंबईने आक्रमक पवित्रा घेतला. अष्टपैलू अभिषेक नायरने पुन्हा एकदा मुंबईसाठी महत्त्वपूर्ण खेळी करताना १४६ चेंडंूत ५ चौकार व ५ षट्कारांसह ९१ धावांची खेळी केली. कर्णधार आदित्य तरेनेही सावधपणे खेळताना ११४ चेंडंूत १२ चौकारांसह ६९ धावांची खेळी केली. यादव आणि तरे बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखविता आली नाही. पुन्हा एकदा सिद्धेश लाड (१५) अपयशी ठरला, तर, बलविंदर संधू (२०), शार्दुल ठाकूर (१) आणि विशाल दाभोळकर (१२) दडपणाखाली बाद झाले. चिंतन गजाने मुंबईकरांच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १२१ चेंडूंत सहा बळी घेतले. आरपी सिंगने दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली, तर रुष कलारिया आणि हार्दिक पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.यानंतर, मोठ्या धावसंख्येचे आव्हान घेऊन उतरलेल्या गुजरातने चांगली सुरुवात केली. समित गोहेल याने सावध भूमिका घेत खेळपट्टीवर टिकून राहण्यावर भर दिला. दुसऱ्या बाजूने प्रियांक पांचाळने खराब चेंडूंचा चांगला समाचार घेताना गुजरातचा धावफलक हलता ठेवला. या दोघांच्या जोरावर गुजरातने चौथ्या दिवअखेर १३.२ षटकांत बिनबाद ४७ धावांची मजल मारली. खेळ थांबला तेव्हा गोहेल (८*) आणि पांचाळ (३४*) नाबाद होते. गुजरातला आपल्या पहिल्या रणजी विजेतेपदासाठी आणखी २६५ धावांची आवश्यकता आहे. (वृत्तसंस्था)धावफलक-मुंबई (पहिला डाव) : ८३.५ षटकात सर्वबाद २२८ धावा.गुजरात (पहिला डाव) : १०४.३ षटकांत सर्वबाद ३२८ धावा.मुंबई (दुसरा डाव) : ३ बाद २०८ धावांपासून पुढे सूर्यकुमार यादव झे. पार्थिव गो. कलारिया ४९, आदित्य तरे पायचीत गो. हार्दिक पटेल ६९, सिध्देश लाड झे. गांधी गो. सिंग १५, अभिषेक नायर पायचीत गो. सिंग ९१, बलविंदर संधू झे. जुनेजा गो. गजा २०, शार्दुल ठाकूर झे. केपी पटेल गो. गजा १, विशाल दाभोळकर झे. गोहेल गो. गजा १२, विजय गोहिल नाबाद ०. अवांतर - १३७.१ षटकांत सर्वबाद ४११ धावा.गोलंदाजी : आरपी सिंग २९.१-८-८३-२; रुष कलारिया २५-११-६३-३; चिंतन गजा ३९-१०-१२१-६; भार्गव मेराई ६-३-१६-०; हार्दिक पटेल २८-२-८९-१; रुजुल भट १०-०-३९-०.गुजरात (दुसरा डाव) : समित गोहेल खेळत आहे ८, प्रियांक पांचाळ खेळत आहे ३४. अवांतर - ५. एकूण : १३.२ षटकात बिनबाद ४७ धावा.गोलंदाजी : शार्दुल ठाकूर ५.२-१-१७-०; बलविंदर संधू ५-१-१९-०; विजय गोहिल २-१-२-०; अभिषेक नायर १-०-४-०.