शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंजर्सचा ‘रॉयल’ विजय

By admin | Updated: May 3, 2015 00:05 IST

युवा फलंदाज मनदीपसिंग याने १८ चेंडूंत नाबाद ४५ धावांचा झंझावात करीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल-

बेंगळुरु : युवा फलंदाज मनदीपसिंग याने १८ चेंडूंत नाबाद ४५ धावांचा झंझावात करीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल-८ मध्ये शनिवारी ७ गड्यांनी विजय मिळवून दिला. पावणेतीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना प्रत्येकी दहा षटकांचा खेळविण्यात आला. त्यात घरच्या मैदानावर विजय मिळवून आरसीबीने विजयी पथावर येण्याचा प्रयत्न केला.केकेआरने आधी फलंदाजीचे आमंत्रण मिळताच दहा षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात १११ पर्यंत मजल गाठली. आंद्रे रसेल याने त्यात ४५ धावांचे योगदान दिले. लक्ष्य गाठणाऱ्या आरसीबीची फलंदाजी रोमहर्षक होती. पण अखेरीस मनदीपने उमेश यादवच्या चेंडूवर सलग दोन चौकार व त्यानंतर रसेलला दोन षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने एकूण ४ चौकार व ३ षटकार मारले. आरसीबीने विजयी लक्ष्य ९.४ षटकांत ११५ धावा करीत गाठले. कर्णधार विराट कोहलीने ३४ धावा केल्या.आरसीबीचा हा आठ सामन्यांतील चौथा विजय आहे. गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या स्थानावर आला. केकेआरचा ९ सामन्यांतील चौथा पराभव ठरला. कोहली- गेल यांनी जलद सुरुवात केली. कोहलीने यादव आणि कमिन्सला उत्तुंग फटके मारून मनसुबे जाहीर केले. केकेआरच्या मागच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग याला गेलने दोन षटकार खेचले. तो तिसरा षटकार मारणार तोच रसेलने त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. पीयूष चावलाने एबी डिव्हिलियर्सला (२)जाळ्यात ओढताच आरसीबीच्या तंबूत खळबळ माजली होती. पण मनदीपने न डगमगता विजयी लक्ष्य गाठून दिले.त्याआधी आरसीबीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण त्यानंतर लगेच मुसळधार पावसाने हजेरी लावताच २ तास ४५ मिनिटांचा खेळ वाया गेला. यामुळे प्रत्येकी दहा षटकांचा सामना खेळविण्याचा निर्णय पंचांना घ्यावा लागला. फॉर्ममध्ये असलेल्या आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीच्या बळावर केकेआरने पावसाच्या व्यत्ययात दहा षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा उभारल्या. रसेलने ४५ धावा ठोकल्या. रसेलने केवळ १७ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्याच्याशिवाय केकेआरचा कुणीही फलंदाज परिस्थितीची गरज ओळखून दीर्घवेळ खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही. (वृत्तसंस्था)