शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान

By admin | Updated: July 22, 2014 00:03 IST

दिल्लीत 2क्1क्ला झालेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तब्बल 1क्1 पदकांची कमाई करून नवा इतिहास रचला होता.

ग्लास्गो : दिल्लीत 2क्1क्ला झालेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तब्बल 1क्1 पदकांची कमाई करून नवा इतिहास रचला होता.मात्र, आता ग्लास्गोत 23 जुलैपासून प्रारंभ होणा:या राष्ट्रकुल स्पर्धेत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भारतासमोर असणार आह़े
गत राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना 38 सुवर्णपदके, 27 रौप्य आणि 36 कांस्यपदकांसह एकूण 1क्1 पदकांची कमाई केली होती़ या कामगिरीच्या बळावर भारताने पदक तालिकेत ऑस्ट्रेलियानंतर (एकूण 177 पदके) दुसरा क्रमांक मिळविला होता़ भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील ही सवरेत्कृष्ट कामगिरी होती़ 
आता ग्लास्गोत पुन्हा भारतीय खेळाडूंचा कस लागणार आह़े भारताने गत राष्ट्रकुलनंतर चीनमधील ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत दुसरे सवरेत्कृष्ट प्रदर्शन केले होत़े दोन वर्षानंतर भारतीय खेळाडूंनी लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके आपल्या नावे करून आपले बेस्ट प्रदर्शन केले होत़े  मात्र, आता ग्लास्गोत होणा:या राष्ट्रकुलमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आह़े कारण भारतीय खेळाडूंच्या तयारीबद्दल भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए), भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि संबंधित खेळांच्या महासंघांनी अधिकृत माहिती दिली नाही़ भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत 224 सदस्यीय पथक उतरवले आह़े विशेष म्हणजे दिल्लीत 21 खेळांचे आयोजन झाले होते; मात्र आता ग्लास्गोत 17 खेळांचेच आयोजन होणार आह़े 17 पैकी भारत केवळ 14 क्रीडा प्रकारांतच आपले नशीब अजमावणार आह़े याच 
कारणामुळे भारताच्या पदकांची संख्या घटेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आह़े (वृत्तसंस्था)
 
राष्ट्रकुलमधून 
तीन खेळ आउट
ग्लास्गोत होणा:या राष्ट्रकुल स्पर्धेतून टेनिस, धनुर्विद्या आणि ग्रीको रोमन कुस्ती या खेळांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आह़े नेमबाजी स्पर्धाची संख्या 36 वरून 19 करण्यात आली आह़े याचाच परिणाम भारताच्या पदकांवर होईल़ कारण बाहेर करण्यात आलेल्या खेळांमध्येच भारताने गत राष्ट्रकुलमध्ये प्रभावी कामगिरी केली. 
 
आयओएकडून निरोप समारंभाला दांडी
ऑलिम्पिक, राष्ट्रकुल किंवा आशियाई या सर्व प्रतिष्ठित स्पर्धेला भारतीय खेळाडू रवाना होण्यापूर्वी परंपरेनुसार निरोप दिला जातो; मात्र ग्लास्गोसाठी रवाना झालेल्या भारतीय खेळाडूंसाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) अधिकृतपणो निरोप समारंभाचे आयोजनच केले नाही़ ग्लास्गोत 22 जुलैपासून राष्ट्रकुल स्पर्धेस प्रारंभ होत आह़े खेळाडूंसाठी एक-दोन निरोप समारंभाचे आयोजन झाले होत़े मात्र, तेसुद्धा खासगी प्रायोजकांनी आयोजित केले होत़े आयओएला खेळाडूंना निरोप देण्याचे शहाणपण सुचलेच नाही़ आयओएचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी हे मोठय़ा खेळाच्या आयोजनापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अधिकृतपणो विदाई समारंभाचे आयोजन करण्यात येत असे आणि त्यात खेळाडू मोठय़ा संख्येने उपस्थित राहत होत़े या प्रसंगी माध्यमांनाही खेळाडूंची तयारी कशी झाली, या संदर्भात माहिती देण्यात येत होती. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे 224 सदस्यीय पथक 14 खेळांमध्ये नशीब अजमावणार आह़े