शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीए एकादश २४३ धावांत गारद

By admin | Updated: December 5, 2014 08:55 IST

वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोनच्या (४ बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आजपासून प्रारंभ झालेल्या

अ‍ॅडिलेड : वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोनच्या (४ बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आजपासून प्रारंभ झालेल्या दुसऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यात क्रिकेट आॅस्ट्रेलियाचा डाव २४३ धावांत गुंडळला. फिलिप ह्युजच्या मृत्यूनंतर एक आठवड्याने उभय संघ मैदानावर परतले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी प्रत्युत्तरात खेळताना भारताने दिवसअखेर २९ षटकांत २ बाद ९९ धावांची मजल मारली होती. सलामीवीर मुरली विजय (३९) आणि प्रभारी कर्णधार विराट कोहली (३०) खेळपट्टीवर होते.
ह्युजच्या दुर्दैवी मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या खेळाडूंनी या सामन्याच्या निमित्ताने मैदानावर पुनरागमन केले. या सामन्याला अधिकृत दर्जा बहाल करण्यात आलेला नाही. भारतीय संघाला नाणेफेक न करताच क्षेत्ररक्षण स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. उभय संघ दोन दिवसांमध्ये प्रत्येकी १००-१०० षटके खेळणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. क्षेत्ररक्षणाच्या वेळी संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या ईशांत शर्माने कोहली व रोहित शर्मा यांना विश्रांतीची पूर्ण संधी मिळावी यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅक्सविलेमध्ये ह्युजच्या अंतिम संस्काराला उपस्थित असलेले कोहली व रोहित शर्मा रात्री उशिरा पोहोचले.
ह्युजला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सामन्याच्या सुरुवातीला एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले. भारतीय खेळाडूंनी काळे आर्मबँड घातले होते. स्कोअर बोर्डवर ‘आरआयपी पी. ह्युज ४०८’ असे लिहिलेले होते. यजमान संघातर्फे जॉर्डन सिल्क आणि यष्टीरक्षक सेब गोच यांनी प्रत्येकी ५८ धावा फटकाविल्या. अ‍ॅरोनने सिल्कला माघारी परतवल्यानंतर नियमित अंतरात प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद झाले. एक वेळ आॅस्ट्रेलिया इलेव्हनची ७ बाद १५९ अशी अवस्था झाली होती, पण गोचने दुसऱ्या टोकाकडून संयमी फलंदाजी केली. त्याने संघाला दोनशेचा पल्ला ओलांडून देताना वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. प्रत्युत्तरात खेळताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर धवन पहिल्याच चेंडूवर चुकीचा फटका खेळून बाद झाला. विजय व पुजारा प्रत्येकी एकदा सुदैवी ठरले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली असता पुजारा जोश लालोरच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये तैनात कर्णधार अश्टोन टर्नरला झेल देत माघारी परतला. (वृत्तसंस्था)

कोहलीही सुदैवी ठरला. यष्टिरक्षकला कोहलीचा झेल टिपण्यात अपयश आले. त्यानंतर कोहलीने विजयाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची अभेद्य भागीदारी केली.