शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

राज्य टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकला कांस्य

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

नाशिक : पुणे येथे झालेल्या ४५ व्या आंतरजिल्हा व ७६ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक प्रकारात नाशिकच्या कॅडेट मुलांच्या संघाने कांस्यपदक पटकावले़

नाशिक : पुणे येथे झालेल्या ४५ व्या आंतरजिल्हा व ७६ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक प्रकारात नाशिकच्या कॅडेट मुलांच्या संघाने कांस्यपदक पटकावले़
कॅडेट मुलांच्या साखळी सामन्यात नाशिकच्या संघाने अकोला संघाचा ३-० ने पराभव केला होता़ दुसर्‍या सामन्यात नांदेडचा ३ -० ने सहज पराभव करत संघाने बाद फेरीत प्रवेश केला होता़ परंतु उपांत्य फेरीत उत्कंठावर्धक झालेल्या पुणेविरुद्धच्या सामन्यात संघाला १-३ ने पराभव स्वीकारावा लागला़ यामुळे संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले़ या सामन्यात नाशिकच्या यश पवारने पुण्याच्या अरब चौधरीचा १२-१०, ११-७, ११-८ असा सहज पराभव करत नाशिकला आघाडी मिळवून दिली होती; परंतु दुसर्‍या सामन्यात पुण्याच्या करण कुकरेजाने स्वराज कुलकर्णीचा सहज पराभव करत बरोबरी साधली़ दुहेरीमध्ये नाशिकच्या यश पवार व सलील गायधनीला पुण्याच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला़ परतीच्या एकेरीत नाशिकच्या यश पवारला आपली लय टिकवता न आल्याने करण कुकरेजाकडून ३-११, ६-११, ८-११ असा पराभव पत्करावा लागला़ त्यामुळे नाशिकच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नाशिकच्या संघामध्ये यश पवार, स्वराज कुलकर्णी, सलील गायधनी यांचा समावेश होता़
फोटो क्रमांक -
फोटो ओळी - राज्य टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक कांस्यपदक मिळवणारा नाश्किचा कॅडेट गटाचा संघ़ समवेत डावीकडून हर्षल पवार, संजय मोडक, शेखर भंडारी, नरेंद्र छाजेड आदि़