शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मेरी कोम, जमुना, लवलिनाला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 04:26 IST

तिसरी मानांकित मेरी कोम युरोपियन चॅम्पियनशिप आणि युरोपियन क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती काकीरोग्लूकडून १-४ ने पराभूत झाली.

उलान उदे : सहावेळची विश्वविजेती एम. सी. मेरी कोम जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य लढतीत ‘वादग्रस्त’ निर्णयाची बळी ठरली. शनिवारी तुर्कस्तानची प्रतिस्पर्धी बुसेनाज काकीरोग्लू हिच्याविरुद्ध ज्युरीच्या वादग्रस्त निर्णयामुळे पराभवाचा धक्का बसल्याने ५१ किलो वजन गटात तिला केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मेरीने केलेले अपीलही तडकाफडकी फेटाळून लावण्यात आले, हे विशेष. या स्पर्धेत पदार्पण करणारी जमुना बोरो हिला ५४ किलो गटात, तर लवलिना बोरगोहेन (६९) हिला उपांत्य लढतीत पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

तिसरी मानांकित मेरी कोम युरोपियन चॅम्पियनशिप आणि युरोपियन क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती काकीरोग्लूकडून १-४ ने पराभूत झाली. मेरीच्या विरोधात निकाल जाताच भारतीय पथकाने रिव्ह्यू मागितला होता. तथापि, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या तांत्रिक समितीने मेरी कोमचे अपील फेटाळून लावले.पहिल्या फेरीपासून मेरीने लढतीवर वर्चस्व गाजविले. मेरीचे हल्ले आक्रमक होते; पण काकीरोग्लूला फूटवर्कचा लाभ घेण्यात अपयश आले. दुसऱ्या फेरीत मात्र काकीरोग्लूने मुसंडी मारली. अखेरच्या तीन मिनिटांत काकीरोग्लूने मेरीवर वर्चस्व गाजविले. या पराभवानंतरही मेरीने विश्व चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा आणखी एक विक्रम केला. विश्व चॅम्पियनशिपमधील मेरी कोमचे हे आठवे आणि ५१ किलोगटात पहिले पदक ठरले. मेरी कोमचे ट्रेनर छोटेलाल यादव हे देखील या निर्णयावर नाराज होते. (वृत्तसंस्था)मंजुराणी फायनलमध्येजागतिक स्पर्धेत प्रथमच खेळणारी भारतीय खेळाडू मंजुराणी हिने शनिवारी शानदार कामगिरीच्या बळावर ४८ किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली. सहावे मानांकन लाभलेल्या मंजुराणीने उपांत्य फेरीच्या लढतीत थायलंडची प्रतिस्पर्धी चुटहामत रखसत हिच्यावर ४-१ ने मात केली. आता सुवर्णपदकासाठी मंजुराणीला आज, रविवारी दुसरी मानांकित रशियाची एकेतरिना पाल्टसेवा हिच्याविरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांत मंजूने केवळ हल्ल्यास प्रत्युत्तर दिले. अखेरच्या तीन मिनिटांत सामना फिरविणारी कामगिरी केली. 

‘का आणि कसा निर्णय..., हा निर्णय किती चुकीचा होता, हे जगाला कळायला हवे. या निर्णयावर मी स्तब्ध आहे. माझा खेळ जिंकण्याइतका भक्कम होता. मला जिंकायलाच हवे होते.’- मेरी कोम