शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

डेव्हिस कपमध्ये ब्रिटनची बरोबरी

By admin | Updated: November 29, 2015 00:59 IST

दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ब्रिटनचा अँडी मरे आणि बेल्जियमचा डेव्हिड गॉफीनने आपल्या स्वतंत्र एकेरी सामन्यात विजय मिळविला आहे. त्यामुळे डेव्हिस कप अंतिम फेरीत स्कोर

घेंट, बेल्जियम : दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ब्रिटनचा अँडी मरे आणि बेल्जियमचा डेव्हिड गॉफीनने आपल्या स्वतंत्र एकेरी सामन्यात विजय मिळविला आहे. त्यामुळे डेव्हिस कप अंतिम फेरीत स्कोर १ -१ असा झाला. २८ वर्षांच्या मरे याने इनडोअर क्ले कोर्टवर झालेल्या या सामन्यात १०८ रँक असलेल्या बेल्जियमच्या रुबेन बेमेलमन्स याचा ६-३, ६-२, ७-५ असा पराभव केला. त्यासोबत जागतिक पातळीवर १६ व्या क्रमांकाचा खेळाडू गॉफीन याने सुरुवातीचे दोन सेट गमाविल्यावर विजयासाठी संघर्ष केला. त्याला पाच सेटपर्यंत झालेल्या या सामन्यात काएले एडमंड याने ३-६, १-६, ६-२, ६-१, ६-० असे पराभूत केले. एडमंड याने पहिला सेट १२ मिनिटांत, तर दुसरा सेट २५ मिनिटांत आपल्या नावे केला. या सामन्यात सुरुवातीला एडमंड याने पूर्ण नियंत्रण ठेवले होते; मात्र तिसऱ्या सेटमध्ये गॉफीन याने १३ हजार दर्शकांच्या उपस्थितीत शानदार पुनरागमन केले. त्याने सलग तीन सेटमध्ये विजय मिळवीत बेल्जियमला आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या सामन्यात अँडी मरेला फारशा अडचणींचा सामना करावा लागला नाही. त्याने सुरुवातीचे दोन सेट सहज जिंकले. तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला मरे काहीसा पिछाडीवर पडला; मात्र आपल्या फोरहँड शॉटमुळे सामना आपल्या नावे केले. ब्रिटनने १९३६ नंतर कधीही डेव्हिस कप जिंकलेला नाही. मरेनेच १९३६ नंतर ब्रिटनसाठी विम्बल्डन ग्रँडस्लॅम जिंकलेला आहे. शेवटी ब्रिटनसाठी फ्रेड पेरी याने हा विजय मिळविला होता. बेल्जियमनेही डेव्हिस कपच्या ११५ वर्षांच्या इतिहासात एकदाही किताब जिंकलेला नाही.