बॉक्सिंग स्पर्धा

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:32+5:302014-12-18T22:39:32+5:30

आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग सामने

Boxing competition | बॉक्सिंग स्पर्धा

बॉक्सिंग स्पर्धा

तर महाविद्यालयीन बॉक्सिंग सामने
गाडगेबाबा कॉलेज, व्हीएनएसएसएमचे बॉक्सर्स चमकले
नागपूर : संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय भुसावळ तसेच वसंतराव नाईक शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाने आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत वर्चस्व मिळविले. सिव्हील लाईन्स येथील नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या रिंकवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पुरुष गटात तुमसरच्या एस. एन. मोर कॉलेजचा अनिकेत रोकडे आणि महिला गटात बिकर कॉलेज हिंगणघाट येथील स्नेहा साईघरे उत्कृष्ट बॉक्सर ठरले. पुरस्कार वितरण छत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ क्रीडा संघटक गिरीश गदगे यांच्याहस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. धनंजय वेळूकर, डॉ, विजय दातारकर,डॉ. संजय दाचेवार, आदित्य सोनी, डॉ. राठोड, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. अविनाश सहारे, डॉ. सुनीता सोनारे, डॉ. अनिता पिल्ले, अरुण बुटे, गणेश पुरोहित आदींची उपस्थिती होती. डॉ. हंबीरराव मोहिते यांनी संचालन केले. डॉ. उदय मेंडुलकर यांनी आभार मानले.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Boxing competition