शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गुणांच्या जोरावर मुंबईला किताब

By admin | Updated: February 7, 2015 01:34 IST

पश्चिम विभागीय १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुणांच्या जोरावर मुंबईला अजिंक्यपदाचा मान मिळाला.

पुणे : पश्चिम विभागीय १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुणांच्या जोरावर मुंबईला अजिंक्यपदाचा मान मिळाला. शुक्रवारी पार पडलेल्या लढतीत बडोदा संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईविरुद्ध वर्चस्व राखले. मात्र स्पर्धेत ८ गुणांसह मुंबई अव्वल असल्याने त्यांना अजिंक्यपद मिळाले, तर सात गुणांसह बडोदा संघाने उपविजेतेपद राखले. पिंपरीच्या व्हेरॉक मैदानावर झालेल्या सामन्यात बडोदाने वर्चस्व राखले. बडोदाने मुंबईला पहिल्या डावात १७८ धावांवर रोखले होते. याचा पाठलाग करताना बडोदाने पहिल्या डावात १२९ षटकांत २७८ धावा करून आघाडी घेतली. अथर्व कारुलकर (८१), कुश मराठे (६३) व अश्रय पटेल (नाबाद ५१) यांच्या खेळीने बडोदा संघाने आघाडी घेतली. मुंबईने दुसऱ्या डावात ७८ षटकांत २२२ धावा केल्या. सलामीवीर दिव्यांश सक्सेना व सुवेद पारकर यांनी शतकी खेळी करीत चांगली फलंदाजी केली. दिव्यांशने १६ चौकारांच्या साहाय्याने १०३, तर पारकर याने १९ चौकारांच्या साहाय्याने १०६ धावा फटकावल्या. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई : पहिला डाव - ७५ षटकांत सर्वबाद १७८ धावा (दिव्यांश सक्सेना ३७, सुवेद पारकर ४४, सिराज घरत नाबाद ६०, अंश पटेल ७/५३, किनीत पटेल ३/१७); दुसरा डाव - ७८ षटकांत १ बाद २२२ धावा (दिव्यांश नाबाद १०३, सुवेद नाबाद १०६, अश्रय पटेल १/२२) अनिर्णीत वि. बडोदा : पहिला डाव -१२६ षटकांत ८ बाद २७२ (मानव परमार २२, अथर्व कारुलकर ८१, कुश मराठे ६३, अश्रय पटेल नाबाद ५१; राजेश सरदार ६/६५, कौशभ चाळके १/४५, यश साळुंके १/२५)