शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बिन्नीची ७८ धावांची खेळी

By admin | Updated: July 14, 2014 05:23 IST

पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीची (७८ धावा, ११४ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) झुंजार अर्धशतकी

नॉटिंघम : पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीची (७८ धावा, ११४ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) झुंजार अर्धशतकी खेळी व त्याने रवींद्र जडेजा (३१) व भुवनेश्वर कुमार (नाबाद ५०) यांच्यासोबत केलेल्या उपयुक्त भागीदारीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज पाचव्या व अखेरच्या दिवशी चहापानापर्यंत दुसऱ्या डावात ८ बाद ३६७ धावांची मजल मारली. भारताकडे दुसऱ्या डावात ३०८ धावांची आघाडी असून २ विकेट शिल्लक आहेत. आज चहापानाला खेळ थांबला त्यावेळी ३१ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या भुवनेश्वर कुमारला ईशांत शर्मा (५) साथ देत होता. भारताच्या पहिल्या डावातील ४५७ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडने पहिल्या डावात ४९६ धावांची मजल मारली. पहिल्या डावात ३९ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारताची दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉडच्या माऱ्यापुढे आज पाचव्या दिवशी सुरुवातीला ६ बाद १८४ अशी अवस्था झाली होती. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीने संघर्षपूर्ण फलंदाजी करीत भारताला सावरले. बिन्नी व जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. या भागीदारीमुळे इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकचे निर्णायक विजय मिळवीत मालिकेत आघाडी घेण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले जाणार आहे. केवळ अखेरच्या सत्राचा खेळ शिल्लक असल्यामुळे कसोटी अनिर्णीत राहणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्याआधी, स्टुअर्ट ब्रॉडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी आज पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवताना भारताच्या मधल्या फळीला धक्के दिले. ब्रॉडने कालचे नाबाद फलंदाज विराट कोहली (०८) आणि अजिंक्य रहाणे (२४) यांना एकापाठोपाठ माघारी परतवले आणि रंगत निर्माण केली. त्यानंतर रवींद्र जडेजाने संयमी खेळी करीत उपाहारापर्यंत भारताला दुसऱ्या डावात ६ बाद २३० धावांनी सन्मानजनक मजल मारून दिली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी लियाम प्लंकेटचे लक्ष्य ठरला. जडेजाने (३१) खाते उघडण्यासाठी ३८ चेंडूंची प्रतीक्षा केली. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीने संघर्षपूर्ण खेळी करीत जडेजाला योग्य साथ दिली. जडेजा व बिन्नी यांनी सातव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करीत भारताचा डाव सावरला. जडेजा माघारी परतल्यानंतर बिन्नीने भुवनेश्वर कुमारच्या साथीने आठव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. बिन्नीला मोईन अलीने माघारी परतवले.