शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
5
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
6
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
7
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
8
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
9
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
10
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
11
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
12
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
15
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
16
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
17
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
18
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
19
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
20
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
Daily Top 2Weekly Top 5

तरुण खेळाडूंवर विश्वास

By admin | Updated: December 5, 2014 00:56 IST

कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. आश्विन, रवींद्र जडेजा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले स्थान पक्के केले आहे.

मुंबई : २०१५च्या विश्वचषक स्पर्धेसाठी गुरुवारी निवडण्यात आलेल्या भारताच्या संभाव्य ३० जणांच्या संघात वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, गौतम गंभीर, झहीर खान आणि हरभजनसिंग या सिनीअर खेळांडूना स्थान देण्यात आलेले नाही. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आलेल्या या संभाव्य संघात तरुण खेळाडूंवरच विश्वास दाखविला आहे.
२०११च्या विश्वचषक विजयात सेहवाग, गंभीर व युवराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तर या संघात हरभजन आणि झहीर यांचाही समावेश होता. मात्र, गेल्या वर्षभरातील त्यांच्या कामगिरीवर लक्ष टाकल्यास त्यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता धूसरच होती. विशेषत: हे पाचही जण गेल्या वर्षभरापासून वन डे संघात खेळलेलेच नाहीत. याव्यतिरिक्त जलदगती गोलंदाज आशिष नेहरा व मुनाफ पटेल, फिरकीपटू पियूष चावला आणि अष्टपैलू युसूफ पठाण यांनाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बाहेरच ठेवण्यात धन्यता मानली आहे. २०११च्या विश्वचषक विजेत्या संघापैकी अनेकांना खराब कामगिरीमुळे डच्चू मिळाला आहे, तर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली आहे आणि एस. श्रीसंत याच्यावर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विश्वविजेत्या संघातील महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, विराट कोहली आणि आर. आश्विन यांची अ‍ॅक्शन पुन्हा पाहायला मिळेल. निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी ही घोषणा केली. जम्मू - काश्मीरचा अष्टपैलू परवेज रसूल, उत्तर प्रदेशचा फिरकीपटू कुलदीप यादव, महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधव, मनीष पांडे आणि अक्षर पटेल यांना स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण खेळीमुळे संभाव्य संघात स्थान मिळाले. संभाव्य संघात असलेल्या अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आणि फॉर्मात असलेला फलंदाज मनोज तिवारीसह यष्टीरक्षक संजू सॅमसन यांची अंतिम १५ जणांमध्ये निवड निश्चित मानली जात आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या
अंतिम संघाची निवड करण्यात येणार आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. आश्विन, रवींद्र जडेजा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले स्थान पक्के केले आहे.
गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा आणि अशोक दिंडा यांना आंतरराष्ट्रीय व स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या बळावर निवडण्यात आले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)