बेल्जियम बाद फेरीत
ओरिजीचा निर्णायक गोल : रशियाला अद्यापही बाद फेरीची आशा
रिओ दि जेनेरिओ : युवा फॉरवर्ड डिवोक ओरिजी याने नोंदविलेल्या शानदार गोलच्या बळावर बेल्जियमने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एच गटातील लढतीत रशियाला १-० अशी धूळ चारली़ या विजयासह बेल्जियमने अंतिम १६ संघांत प्रवेश मिळविला आहे़
विशेष म्हणजे या लढतीत ओरिजी याला बेल्जियमचे प्रशिक्षक मार्क विलमोर्टस् यांनी उत्तरार्धात मैदानात उतरविले होते़ त्याने आपल्या प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवीत संघाला विजय मिळवून दिला़ रेड डेव्हिल्स बेल्जियमला रशियन संघाचा डिफेन्स भेदणे अवघड झाले होते; मात्र अखेर निर्धारित वेळेच्या अवघ्या २ मिनिटे आधी ओरिजीने मिडफिल्डर ईडेन हजार्डच्या मदतीने शानदार गोल नोंदविला़
१९ वर्षीय ओरिजी बेल्जियमकडून विश्वचषक स्पर्धेत गोल नोंदविणारा सर्वांत युवा आणि स्पर्धेच्या इतिहासात अखेरच्या क्षणी गोल नोंदविणारा युवा फुटबॉलपटू ठरला आहे़ या विजयासह बेल्जियमच्या खात्यात ६ गुण जमा झाले आहेत़ हा संघ आता बाद फेरीत पोहोचला आहे़ बेल्जियमने आपल्या पहिल्या सामन्यात अल्जेरियावर २-१ असा विजय मिळविला होता़
रशियाला या लढतीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांचे बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. मात्र यांना त्यासाठी इतर संघांच्या जय-पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे़ रशियाचा स्पर्धेतील दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता़
बेल्जियम संघ याआधी १९८६ मध्ये विश्वकपच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता़ १९९० पर्यंत तर या संघाला बाद फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती़ विशेष म्हणजे स्पर्धेतील आतापर्यंत झालेले तीनही गोल बदली खेळाडूंनी केले आहेत.
बेल्जियम-रशिया लढत
By admin | Updated: June 23, 2014 00:09 IST
बेल्जियम बाद फेरीत
बेल्जियम-रशिया लढत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}