शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमांच्या बरसातीने विराटपर्वाची सुरुवात

By admin | Updated: January 15, 2017 22:54 IST

भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना सर्वार्थाने गाजवला तो कर्णधार विराट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15  - भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना सर्वार्थाने गाजवला तो कर्णधार विराट कोहली आणि घरच्या मैदानावर खेळत असलेला पुणेकर केदार जाधवने. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच पूर्णवेळ कर्णधार म्हणून संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या विराटने पुण्यात विक्रमांची बसरात करत क्रिकेटमधील आपल्या नव्या डावाची दणक्यात सुरुवात केली. विराट आणि भारतीय संघाने या लढतीत नोंदवलेल्या विक्रमांचा संक्षिप्त आढावा..
पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक
विराट कोहलीने याआधी भारताच्या कसोटी संघाचे, तसेच मर्यादित षटकातील संघांचे कर्णधारपद भूषवले होते, पण पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात शतक फटकावण्याची किमया विराटने साधली. त्याने अवध्या 93 चेंडूत शतकी मजल मारली.
धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके ठोकण्याच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
विराट कोहलीची फलंदाजी आव्हानाचा पाठलाग करताना विशेष बहरते. आजही  इंग्लंडने दिलेल्या मोठ्या आव्हानासमोर त्याची फलंदाजी बहरली. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना आज पुन्हा एकदा शतकी खेळी केली, धावांचा पाठलाग करतानाचे विराटचे हे 17 वे शतक ठरले. त्याबरोबरच धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरने फटकावलेल्या 17 शतकांच्या विक्रमाशीही विराटने बरोबरी साधली.
पाचव्या गड्यासाठी सर्वात मोठी भागीदारी
 351 धावांचा पाठलाग करताना भारताचे चार खंदे फलंदाज झटपट माघारी परतल्यावर विराट कोहलीने केदार जाधवसोबत भारताचा डाव सावरला. विराट आणि केदारने पाचव्या गड्यासाठी 200 धावांची भागीदारी केली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एकदिवसीय सामन्यात पाचव्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ. त्यांनी रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनीने पाचव्या गड्यासाठी केलेल्या 167 धावांच्या भागीदारीचा विक्रम  मोडीत काढला.
आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना चौथी सर्वात मोठी धावसंख्या 
विराट आणि केदारने शानदार शतके फटकावताना केलेल्या  द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने 350 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची किमया साधली. भारताने आज फटकावलेल्या 356 धावा आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली चौथी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. याआधी दक्षिण आफ्रिकेने 2006 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध  438, त्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 साली दर्बान येथे दुसऱ्या डावात 372 धावा कुटल्या होत्या. तर भारतीय संघाने 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना जयपूर येथे 362 धावा कुटल्या होत्या.