शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लोढा पॅनेलपुढे बीसीसीआयची बाजू मार्कंडेय काटजू मांडणार

By admin | Updated: August 3, 2016 04:12 IST

माजी न्या. मार्कंडेय काटजू यांना बीसीसीआयने लोढा पॅनलपुढे स्वत:ची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर पॅनलच्या चार सदस्यीय समितीचे प्रमुख नेमले आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. मार्कंडेय काटजू यांना बीसीसीआयने लोढा पॅनलपुढे स्वत:ची बाजू मांडण्यासाठी कायदेशीर पॅनलच्या चार सदस्यीय समितीचे प्रमुख नेमले आहे.सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या सुधारणा कशा लागू करता येतील, याबद्दल काटजू आणि त्यांचा चमू मार्गदर्शन करणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी झालेल्या कार्य समितीच्या बैठकीत काटजू यांना चर्चेसाठी माध्यम बनविण्याचा निर्णय घेतला. काटजू हे लोढा समितीशी चर्चा करतील शिवाय जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्डाला योग्य सल्ला देतील. काटजू यांच्याशिवाय या पॅनलमध्ये कायदेतज्ज्ञ अभिनव मुखर्जी यांचा देखील समावेश असेल. काटजू हे २००६ ते २०११ या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. याशिवाय प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे चेअरमन राहिले. दिल्ली, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व अलाहाबाद हायकोर्टाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती देताना सांगितले की, लोढा समितीच्या शिफारशी लागू केल्यानंतर होणाऱ्या अडचणी आणि बदल याची माहिती देणारी तसेच कायदेशीर भाषा समजावून सांगणारी व्यक्ती बीसीसीआयला हवी होती. याकारणास्तव बीसीसीआयने काटजू यांना पॅनल प्रमुख बनण्याचा आग्रह केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे अनिवार्य होऊन बसले. पुढील सहा महिन्यात शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी लोढा समिती सहकार्य करण्यास तयार आहे. बीसीसीया अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘‘सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिवर्तन करण्याची गरज आहे.’’ (वृत्तसंस्था)