बाणावलीचा शानदार विजय

By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:06+5:302014-12-02T00:36:06+5:30

आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धा : सिबर्न फर्नांडिसची हॅट्ट्रिक

Bannavali's Superb Victory | बाणावलीचा शानदार विजय

बाणावलीचा शानदार विजय

तरकेंद्र फुटबॉल स्पर्धा : सिबर्न फर्नांडिसची हॅट्ट्रिक
पणजी : वोडाफोनच्या सहकार्याने गोवा फुटबॉल विकास महामंडळाने आयोजित केलेल्या फुटबॉल महोत्सवातील आंतर केंद्र स्पर्धेतील १० वर्षांखालील मुलांच्या गटात बाणावली संघाने उतोर्डावर ५-० ने विजय नोंदवला. या सामन्यात सिबर्न फर्नांडिसने हॅट्ट्रिक नोंदवली. क्लेन आणि रिची फर्नांडिस यांनीही गोल नोंदवत विजयात वाटा उचलला. दुसर्‍या सामन्यात, १३ वर्षांखालील मुलांच्या गटात, बाणावलीने उतोर्डाचा ४-० ने पराभव केला. या सामन्यात ॲस्ट्रोन रॉड्रिगीसने दोन गोल नोंदवले.
१० वर्षांखालील मुलांच्या सामन्यात साखळीने माशेलवर २-० ने विजय नोंदवला. सामन्यात डायलोन गोम्स आणि सुयश नाईक यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. अन्य सामन्यात, आंबेलीने पहिला विजय मिळवला. त्यांनी शिरोडा संघाचा पराभव केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Bannavali's Superb Victory