शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीकडून बबिता कुमारीचा 5-1नं पराभव

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

महिला कुस्तीच्या 53 किलोग्राम फ्री स्टाइलच्या उपउपांत्यपूर्व फेरीत ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीनं बबिता कुमारीला 5-1नं पराभवाची धूळ चारली आहे.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. 18 -  भारतीय मल्ल बबिता कुमारीला महिलांच्या ५३ किलो वजनगटात उपउपांत्यपूर्व फेरीत गुरुवारी युनानच्या मारिया प्रिवोलाराकीविरुद्ध गुणांच्या आधारावर १-५ ने पराभव स्वीकारावा लागला.या सोबतच भारताचे महिला कुस्तीतील आॅलिम्पिकचे आव्हान संपुष्टात आले.

साक्षी मलिकच्या ऐतिहासिक विजयानंतर सर्वांची नजर बबितावर केंद्रित झाली  होती, पण ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण व विश्व चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या भारतीय मल्ल बबिताची आक्रमक रणनीती यशस्वी ठरली नाही.दोनदा आपल्याच डावामध्ये अडकल्यामुळे तिला ही लढत गमवावी लागली.

मारियाने चांगली सुरुवात केली. तिने बबिताला सुरुवातीलाच बाहेर करीत एक गुण वसूल केला. त्यानंतर २६ वर्षीय बबिताने चांगला प्रयत्न केला, पण तिला आपल्या डावाचा अचूक वापर करता आला नाही. मारियाने प्रत्युत्तर देतान दोन गुण वसूल करीत तीन मिनिटांनंतर पहिल्या फेरीत ३-० अशी आघाडी घेतली.

बबिता दुसऱ्या फेरीत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक दिसली. तिही साक्षीप्रमाणे पुनरागमन करण्यास ओळखली जाते, पण युनानच्या मल्लाने तिला तशी संधी दिली नाही. बबिताने चांगला प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा तिचा डाव तिच्यावरच उलटला. मारियाने दोन गुण वसूल करीत विजय निश्चित केला.

आता मारिया अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली तर बबिताला रेपेचेज खेळण्याची संधी मिळेल. साक्षीने बुधवारी ५८ किलो वजन गटात रेपेचेजच्या आधारावर कांस्यपदक पटकावले होते