द.आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश

By Admin | Updated: October 13, 2016 17:46 IST2016-10-13T17:46:38+5:302016-10-13T17:46:38+5:30

डेव्हिड वॉर्नरच्या शानदार शतकी खेळीनंतरही (173) ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोर जावं लागलं आहे

Australia's White Wash | द.आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश

द.आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश

ऑनलाइन लोकमत
केपटाऊन, दि. 13 - डेव्हिड वॉर्नरच्या शानदार शतकी खेळीनंतरही (173) ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोर जावं लागलं आहे. आस्ट्रेलिया-द.आफ्रिका यांच्या दरम्यान पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील केपटाऊनमध्ये झालेला शेवटाचा सामना दक्षिण आफ्रिकेने 31 धावांनी जिंकला आणि मालिकेमध्ये 5-0 असं यश मिळवल. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाने वन डे क्रमवारीतल अव्वल स्थान कायम राखलंय, मात्र दुसऱ्या स्थानावरील दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियापेक्षा केवळ दोनच गुणांनी पिछाडीवर आहे.

शेवटच्या सामन्यात द.आफ्रिकेकडून रिली रोसूच्या 122 आणि जेपी ड्युमिनीच्या 73 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 327 धावांची मजल मारली होती. विजयासाठी 328 धावांचा पाठलाग करताना वॉर्नरने 136 चेंडूंत 173 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 24 चौकारांचा समावेश होता.मात्र वार्नरची ही स्फोटक खेळी संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव 48.2 षटकात 296 धावांवर संपला. एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाज व्हाईट वॉशला सामोरं जाव लागलं आहे. 

 

Web Title: Australia's White Wash