शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

पर्थमध्ये आॅस्ट्रेलियाचा खुर्दा

By admin | Updated: November 8, 2016 03:48 IST

वेगवान गोलंदाज कॅसिगो रबाडा याच्या पाच बळींमुळे दक्षिण आफ्रिकेने सोमवारी संपलेल्या पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाला मोसमातील पहिल्या

पर्थ : वेगवान गोलंदाज कॅसिगो रबाडा याच्या पाच बळींमुळे दक्षिण आफ्रिकेने सोमवारी संपलेल्या पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाला मोसमातील पहिल्या कसोटीत त्यांच्याच घरच्या मैदानावर तब्बल १७७ धावांनी नमविले. कसोटीतील आॅस्ट्रेलियाचा हा सलग चौथा पराभव होता. ५३९ धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ३६१ धावांत संपुष्टात आला. १९८८ नंतर आॅस्ट्रेलियाने मोसमातील पहिला सामना गमाविला नव्हता; पण डेल स्टेन खांद्याच्या दुखण्यामुळे बाहेर होताच रबाडाने वेगवान माऱ्याची जबाबदारी स्वीकारीत आफ्रिकेला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. रबाडाने ९२ धावांत ५ गडी बाद केले. पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या फिरकीपटू केशव महाराज याने ९४ धावांत एक गडी टिपला. आॅस्ट्रेलियाच्या पीटर नेव्हिल याने सर्वाधिक नाबाद ६० धावा केल्या. स्टि स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियाने जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यात तिन्ही कसोटी सामने गमाविले. आॅस्ट्रेलियाने ४ बाद १६९ वरून खेळायला सुरुवात केली तेव्हा सामना अनिर्णीत राखायचा हेच टार्गेट होते. सामनावीर रबाडाने मात्र त्यांच्या आशा धुळीस मिळविल्या. स्टेन खांद्याच्या दुखापतीमुळे सहा महिने खेळापासून दूर राहील. रबाडाने त्याची उणीव भरून काढली. २१ वर्षांच्या या गोलंदाजाने चौथ्या दिवशी तीन आणि पाचव्या दिवशी दोन गडी बाद करीत यजमानांचे कंबरडे मोडले. नऊ कसोटीत चौथ्यांदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी त्याने केली. रबाडाने या वयात केलेला आफ्रिकेसाठी हा नवा विक्रम ठरला.पाचव्या दिवशी रबाडाचा यॉर्कर मिशेल मार्शच्या (२६) पायावर आदळला. त्याने केलेले पायचितचे अपील पंच अलिम दार यांनी फेटाळले; पण तिसऱ्या पंचाने मार्शला बाद दिले. उस्मान ख्वाजासोबत (९७) स्टार्कची ५० धावांची भागीदारी झाली. अखेर रबाडानेच स्टार्कला पायचित करीत स्वत:चा पाचवा बळी घेतला. रविवारी त्याने शॉन मार्श (१५), स्मिथ (३४) आणि अ‍ॅडम बोगेस (१) यांना तंबूची वाट दाखविली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात शतक ठोकणारा जेपी ड्यूमिनी याने ख्वाजाला बाद केले. डेव्हिड वॉर्नरला सुरेख धावबाद करणारा तेम्बा बावुमा यालादेखील गोलंदाजी देण्यात आली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर पहिला बळी मिळविला होता. ख्वाजाला त्याने पायचित केले होते; पण रिप्लेमध्ये बावुमाचा पाय रेषेबाहेर असल्याचे निष्पन्न होताच तो ‘नो बॉल’ ठरला. नंतर त्याने जोश हेजलवुड (२९) याला बाद केले.दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २४२ धावा केल्यानंतर बिनबाद १५८ अशी झकास सुरुवात करणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा डाव २४४ धावांत गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ८ बाद ५४० वर डाव घोषित करीत यजमान संघाला विजयासाठी ५३९ धावांचे आव्हान दिले होते. (वृत्तसंस्था)धा व फ ल कदक्षिण आफ्रिका पहिला डाव २४२. आॅस्ट्रेलिया पहिला डाव २४४. दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ५४०/८ घोषितआॅस्ट्रेलिया दुसरा डाव - मार्श झे. डु प्लेसिस गो. रबाडा १५, वॉर्नर धावचित (बवुमा) ३५, ख्वाजा पायचित गो. ड्युमिनी ९७, स्मिथ झे. डी कॉक गो. रबाडा ३४, व्होग झे. डी. कॉक गो. रबाडा १, मार्श पायचित गो. रबाडा २६, नेव्हील नाबाद ६०, स्टार्क पायचित गो. रबाडा १३, सिडल पायचित गो. फिलिंडर १३, हॅझलवूड गो. इल्गर, गो. बवुमा २९, ल्योन पायचित गो. महाराज ८. अवांतर ३०, एकूण ११९ षटकांत सर्वबाद ३६१. गडी बाद क्रम : १-५२, २-५२, ३-१४४, ४-१४६, ५-१९६, ६-२४६, ७-२६२, ८-२८०, ९-३४५, १०-३६१. गोलंदाजी : रबाडा ३१-६-९२-५, फिलिंडर २२-७-५५-१, ड्युमिनी १७-१-५१-१, महाराज ४०.१-१०-९४-१, कुक २-०-१६-०, बवुमा ७-१-२९-१.शेन वॉर्नने फोडले स्मिथवर खापरदक्षिण आफ्रिकेकडून आॅस्ट्रेलियाच्या झालेल्या पराभवाबद्दल माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याने कर्णधार स्टीव्ह स्मिथला जबाबदार धरले आहे. त्याच्या खराब कप्तानीमुळेच आॅस्ट्रेलियाला पराभवाचे तोंड पहावे लागले असे त्याने म्हटले आहे.३७ डिग्री सेल्सीयस तापमानात जलदगती गोलंदाज मोठे मोठे स्पेल टाकून दमले होते, त्यांना बळीही मिळत नव्हते, अशावेळी फिरकी गोलंदाज नॅथन लियोनकडून जास्त गोलंदाजी करुन घेण्याची गरज होती. परंतु, त्याला केवळ १२ षटकेच गोलंदाजी देण्यात आली. लियोनला पहिल्या सत्रात गोलंदाजी मिळाली नाही, अन्य गोलंदाजांचा पर्याय वापरुन झाल्यानंतर त्याच्याकडे चेंडू देण्यात आला, अशा गोष्टीमुळे त्याचा आत्मविश्वास ढळू शकतो