शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

‘पंच’तारांकित विजयासाठी आॅस्ट्रेलिया सज्ज

By admin | Updated: February 10, 2015 01:59 IST

विश्वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची

विश्वास चरणकर, कोल्हापूरविश्वचषक स्पर्धेच्या प्रारंभी वेस्ट इंडीज संघाने क्रिकेटवर अधिराज्य गाजविले, पण सत्ता आणि संपत्ती सदासर्वकाळ टिकत नसते याची प्रचिती क्रिकेटमध्येही आली. नव्वदीच्या दशकानंतर क्रिकेटमध्ये आॅन दि फिल्ड आणि आॅफ दि फिल्ड बरीच उलथापालथ झाली. पण या सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे वेस्ट इंडिजची सद्दी संपून आॅस्ट्रेलिया नवा सम्राट म्हणून उदयास आला. १९८७ला त्यांनी पहिला विश्वचषक जिंकला. त्यानंतरच्या सहा वर्ल्डकपपैकी तीन वर्ल्डकप त्यांनी जिंकले. सर्वाधिक चारवेळ विश्वचषक जिंकणारा संघ म्हणून त्यांचा दबदबा आहे. १९७५ च्या पहिल्या विश्वचषकात आॅस्ट्रेलियाने थेट फायनलपर्यंत धडक मारली, पण वेस्ट इंडीजच्या पोलादी भिंतीपुढे त्यांचो वादळ शमले. पुढच्या दोन विश्वचषकात त्यांना पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. भारत आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त यजमापदाखाली झालेल्या १९८७ चा विश्वचषक हा आॅस्ट्रेलियाच्या साम्राज्याची नांदी होती. या स्पर्धेत इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया हे दोन पारंपारीक विरोधक फायनलमध्ये आमने-सामने आले. आॅस्टे्रलियाला २५३ वर गुंडाळून इंग्लंडने सामन्यात वर्चस्व निर्माण केले, पण आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी ५० षटकात ८ बाद २४६ पर्यंत इंग्लंडला रोखून धरले. इंग्लंडचा ८ धावांनी पराभव झाला. अ‍ॅलन बोर्डरच्या नेतृत्त्वाखाली आॅस्ट्रेलिया पहिल्यांदाच जगज्जेता ठरला. कोलकात्याच्या ईडन गार्डनच्या साक्षीने क्रिकेट जगतात एक नवा राजा राज्य करण्यास अवतरला होता. त्यानंतर १९९२ साली इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात पावसाच्या कृपेने पाकिस्तानला एक गुण जास्त मिळाल्यामुळे त्यांना सेमीफायनल गाठता आली नाही. तर १९९६ ला त्यांनी अंतिम फेरी गाठली पण श्रीलंकेने त्यांना पछाडून विश्वविजेतेपद जिंकले. १९९९, २00३ आणि २00७ असे सलग तीनवर्षे त्यांनी विश्वविजेतेपद मिळविले. म्हणजे सलग १५ वर्षे त्यांच्या डोक्यावर विश्वविजेतेपदाचा मुकुट होता. १९९९च्या विश्वचषकाची फायनल अक्षरश एकतर्फी झाली. आॅस्ट्रेलियाने पाकला केवळ १३२ धावात रोखले. हे आव्हान कांगारुंनी दोन गड्यांच्या मोबदल्यात २० षटकातच गाठले. या स्पर्धेत भारताने उपांत्यफेरीत त्यांना घरी घालवून त्यांच्या नावापुढे ‘माजी विश्वविजेते’ असे विशेषण लावले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आॅस्ट्रेलिया हा सर्वात प्रबळ दावेदार आहे. इतिहासातील आकडेवारीवरुन त्यांच्याविषयी हे बोलले जात नाही, तर त्यांच्या संघातील खेळाडूंवर नजर टाकली की हे लक्षात येते. आजच्या आॅस्ट्रेलियन संघात प्रत्येक जागेवर त्यांच्याकडे तीन-तीन पर्याय आहेत. इतकेच नाही तर कर्णधारपदासाठीही त्यांच्याकडे तीन आॅप्शन आहेत. मायकेल क्लार्क फिट होवून संघात आला तर जॉर्ज बेलीला संघात ‘स्लॉट’च उपलब्ध होत नाही. आजच्या संघात सलामीवीर अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर ही जोडी सर्वात विध्वंसक समजली जाते. पाठोपाठ शेन वॉटसन, मिशेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, बेली/क्लार्क, यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडीन हे सगळेच फार्मात आहेत. आयपीएलचा मिलेनियर ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर त्यांच्याकडे आहे. अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यात नसतील तेवढी क्षेपणास्त्रे आॅस्ट्रेलियन गोलंदाजीत आहेत. गेली दोन वर्षे मिशेल जॉन्सन हा जगातील सर्व खेळपट्टयांवर धुमाकूळ घालतोय. त्यात मायदेशातील खेळपट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी ‘सोने पे सुहागा.’ जोडीला मायकेल स्टार्क, जोश हेजलवूड, झेव्हिअर डोहर्टी, पॅट कमिन्स आणि जेम्स फॉल्कनेर अशी तगडी स्टारकास्ट विरोधीपक्षाच्या चिंधड्या उडविण्यास समर्थ आहे. बलाढ्य संघ, होमग्राउंड आणि प्रेक्षकांचा पाठिंबा या जोरावर आॅस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्यास सज्ज आहे.