शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी प्रायव्हेट पार्ट मोठा करण्यासाठी इंजेक्शन घेतायत खेळाडू; कशासाठी एवढे खटाटोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:04 IST

Winter Olympics 2026 Penisgate : २०२६ हिवाळी ऑलिम्पिकमध्ये 'पेनिस-गेट' प्रकरणामुळे खळबळ. स्की जंपर्सनी हायलरुरोनिक ॲसिड वापरून स्की सूटचा आकार वाढवल्याचा आरोप.

२०२६ च्या मिलानो कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच एका विचित्र आणि धक्कादायक प्रकरणामुळे क्रीडा विश्व हादरले आहे. या प्रकरणाला 'पेनिस-गेट' असे नाव देण्यात आले असून, स्की जंपिंग खेळातील काही खेळाडू चक्क आपल्या गुप्तांगात 'हायरुरोनिक ॲसिड' टोचून घेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

स्की जंपिंगमध्ये खेळाडूच्या शरीराच्या मोजमापानुसार त्याचा 'स्की सूट' तयार केला जातो. जर एखाद्या खेळाडूच्या गुप्तांगाचा आकार वाढलेला असेल, तर नियमानुसार त्याला थोडा मोठा 'स्की सूट' मिळतो. वैज्ञानिक संशोधनानुसार, जर सूटचा आकार २ सेंटीमीटरने जरी वाढला, तरी हवेचा रोध ४ टक्क्यांनी कमी होतो आणि हवेत राहण्याची क्षमता ५ टक्क्यांनी वाढते. यामुळे खेळाडूला सुमारे ५.८ मीटर जास्त लांब उडी मारण्यास मदत होऊ शकते. हा अतिरिक्त फायदा मिळवण्यासाठी खेळाडू हायलरुरोनिक ॲसिडचे इंजेक्शन घेत असल्याचे समोर आले आहे. जेवढा मोठा सूट तेवढे पायाचा व्ही शेप रुंदावता येतो. यामुळे तेवढी जास्त लांब झेप घेता येते. याचे जादा गुण मिळतात. नेमका याच गोष्टीचा फायदा हे खेळाडू घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  

जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेची भूमिका
'वाडा'चे अध्यक्ष विटोल्ड बांका यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. हायलरुरोनिक ॲसिड हे सध्या 'बॅन्ड' पदार्थांच्या यादीत नाही, परंतु कामगिरी सुधारण्यासाठी अशा प्रकारे त्याचा वापर करणे हे खेळाच्या नैतिकतेच्या विरोधात आहे का, याची तपासणी 'वाडा'ची समिती करणार आहे.

धोकादायक परिणाम
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हे कृत्य केवळ अनैतिकच नाही तर अत्यंत जीवघेणेही आहे. चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या इंजेक्शनमुळे गुप्तांगाला संसर्ग होणे, वेदना होणे, कायमचे विद्रुपीकरण होणे आणि दुर्मिळ प्रसंगी 'गँग्रीन' होऊन ते अंग कापून टाकावे लागण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Athletes Injected Private Parts Before Olympics for Advantage: Shocking!

Web Summary : Ski jumpers allegedly inject hyaluronic acid into their genitals to increase ski suit size. This provides an aerodynamic advantage, leading to longer jumps. WADA is investigating the ethical implications and health risks, including infection and gangrene.
टॅग्स :Olympicsऑलिंपिक