Asian Games 2018: भारताच्या स्वप्ना बर्मनला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:07 PM2018-08-29T19:07:58+5:302018-08-29T19:08:32+5:30

भारताने अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

Asian Games 2018: India's Swapna Barman won gold medal | Asian Games 2018: भारताच्या स्वप्ना बर्मनला सुवर्णपदक

Asian Games 2018: भारताच्या स्वप्ना बर्मनला सुवर्णपदक

googlenewsNext
ठळक मुद्देया खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो.

जकार्ता , आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताने अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताच्या स्वप्ना बर्मनने भारताला हे सुवर्णपदक जिंकवून दिले.



 

या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.


Web Title: Asian Games 2018: India's Swapna Barman won gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.