शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

अश्विन वर्ल्ड नंबर २

By admin | Updated: December 1, 2015 03:23 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयसीसीतर्फे सोमवारी जाहीर

दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आयसीसीतर्फे सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या कसोटी गोलंदाजांच्या मानांकनामध्ये तीन स्थानाने प्रगती करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानी झेप घेतली. अश्विनसह डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि लेग स्पिनर अमित मिश्रा यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन पटकावले. या तीन फिरकीपटूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळविला तर मानांकनामध्ये टीम इंडियाला दुसऱ्या स्थानावर दाखल होण्याची संधी राहील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत एकूण १२ बळी घेत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या अश्विनला चमकदार कामगिरीचे गिफ्ट मिळाले आहे. अश्विन कसोटी मानांकनामध्ये ८५६ मानांकन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यापूर्वी अश्विन ८०६ मानांकन गुणांसह पाचव्या स्थानी होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे अश्विनला ५० मानांकन गुणांचा लाभ झाला आहे. नागपूर कसोटी सामन्याला मुकलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला ९ मानांकन गुणांचे नुकसान सोसावे लागले आहे, पण तो ८८४ मानांकन गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. अश्विनच्या मानांकनातील स्थानात सुधारणा झाल्यामुळे पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाह आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसन (प्रत्येकी ८४६ मानांकन गुण) यांची संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे, तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अश्विनव्यतिरिक्त जडेजा आणि मिश्रा यांनाही चमकदार कामगिरीचे गिफ्ट मिळाले आहे. जडेजाला दोन स्थानांचा लाभ झाला असून तो ६९३ मानांकन गुणांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम ११ व्या स्थानी पोहोचला आहे, तर अमित मिश्राने तीन स्थानांची प्रगती करताना ४२६ मानांकन गुणांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम ३१ व्या स्थानी धडक दिली आहे.