शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कसोटीपटू आशिष कपूरला डच्चू, राकेश पारिख कायम

By admin | Updated: January 18, 2017 05:05 IST

माजी कसोटीपटू आशिष कपूर याला डच्चू देत प्रथमश्रेणी क्रिकेटपटू राकेश पारिख याला कायम ठेवल्यामुळे संभ्रम वाढला आहे.

नवी दिल्ली : ज्युनियर निवड समितीतून माजी कसोटीपटू आशिष कपूर याला डच्चू देत प्रथमश्रेणी क्रिकेटपटू राकेश पारिख याला कायम ठेवल्यामुळे संभ्रम वाढला आहे. बङोदा क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष, संयुक्त सचिव आणि उपाध्यक्ष या पदांवर ११ वर्षे राहिल्याने पारिख लोढा समितीच्या शिफारशीनुसार अपात्र ठरतात. सिनियर आणि ज्युनियर निवड समितीत तीनच निवडकर्ते असतील, अशी लोढा समितीची अट आहे.कसोटी क्रिकेट खेळले नसल्याने जतीन परांजपे आणि गगन खोडा यांना सिनियर निवड समितीतून डच्चू देण्यात आला होता. ज्युनियर निवड पॅनलवर निवडीसाठी ५० प्रथमश्रेणी सामने खेळण्याची अट होती. ही अट पाचही निवडकर्ते पूर्ण करीत होते. पारिख आणि अमित शर्मा हे कुठल्याही स्तरावर भारतातर्फे खेळलेले नाहीत. व्यंकटेश प्रसाद भारताकडून ३३ कसोटी आणि १०० वन-डे खेळले आहेत. कपूरने चार कसोटी आणि १७ वन डेत देशाचे प्रतिनिधित्व केले. ज्ञानेंद्र पांडे दोन वन डे खेळला आहे. निवडकर्त्यांना घरी पाठविण्याची वेळ येताच अमित शर्मासोबत कपूरलाही बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, बीसीसीआयचे महाव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी पाठविलेल्या ई-मेलमध्ये २०१५ च्या आमसभेत निवडल्यानुसार कपूर आणि शर्मा हे निवडकर्ता म्हणून कायम असल्याचे म्हटले होते. व्यंकटेश प्रसाद, पारिख आणि ज्ञानेंद्र हे देखील कायम आहेत. पारिखला कायम ठेवण्यावर आता प्रश्नचिन्ह लागले आहे. पारिख म्हणाले, ‘प्रशासनात माझा कार्यकाळ संपला आहे. मी ११ वर्षे पदावर होतो. मी २०१५ ला बीसीसीआयचा राजीनामा दिला. त्यानंतर निवडकर्ता बनलो. मला का कायम ठेवण्यात आले, यावर प्रतिक्रिया देणार नाही.’पारिख यांना कायम ठेवल्याबद्दल वाद उद्भवताच एक ज्येष्ठ पदाधिकारी म्हणाला, ‘लोढा समितीच्या शिफारशी बघता अपात्र सदस्य कुठल्याही समितीत काम करू शकत नाही. पारिख यांना कसे घेतले, याचे आश्चर्य वाटते. ज्युनियर निवडकर्ता म्हणून पारिख यांची ही दुसरी टर्म आहे. २००६ ते २००८ हा त्यांचा पहिला कार्यकाळ होता. अशा वेळी त्यांना पदावरून हटविण्यात यावे.’१९ वर्षे गटाच्या संभाव्य संघावर स्वाक्षरी करण्यास कपूर यांनी नकार दिल्याची चर्चा आहे. बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका न पटल्यामुळे ही कारवाई असावी, असे सूत्रांचे मत आहे.६ जानेवारी रोजी लोढा समितीचे सचिव गोपाल शंकरनारायण यांचा निवडकर्त्यांना ई-मेल आला. त्यात दोन्ही संघ निवडण्याची परवानगी बहाल करण्यात आली. आशिष यांनी ई-मेलची प्रत मागितली. प्रत पाहताच त्यांनी निवड यादीवर स्वाक्षरी केली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत विलंब लावल्यामुळे आशिष यांची कृती अवहेलना मानून बीसीसीआयने त्यांच्यावर सूड उगवल्याचे मानले जात आहे. कपूर यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही बोलणे होऊ शकले नाही. (वृत्तसंस्था)