ए.आर. रेहमानसोबत विराटने धरला ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 11:29 IST2016-06-25T11:29:34+5:302016-06-25T11:29:46+5:30

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ऑस्करविजेता संगीत दिग्दर्शक ए.आर.रेहमानसोबत एका व्हिडिओत गाताना दिसणार आहे.

A.R. Controversy over Rehman with Virat | ए.आर. रेहमानसोबत विराटने धरला ठेका

ए.आर. रेहमानसोबत विराटने धरला ठेका

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला आपण निवांत मूडमध्ये असताना अनेक वेळा मैदानावर नाचताना किंवा एखाद्या कार्यक्रमात गाताना पाहिलं आहे. इतर खेळाडूंबरोबर मजा करतानाचे त्याचे असे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले असून त्याच्या डान्सचा अनोख अंदाज अनेकांनी पाहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पार्टींमध्ये विराटचा गाता गळाही ब-याच जणांनी अनुभवला आहे. त्याच्या या रूपावर चाहते नेहमीच खूप खुश असतात. पण आता विराट एका व्हिडीओमध्ये चक्क ऑस्करविजेता संगीत दिग्दर्शक ए.आर.रेहमानसोबत नाचता-गाताना दिसणार आहे. 
 
(विराट कोहलीने गायलं ए. आर. रेहमानसाठी गाणं)
  •  
 
फुटबॉलचं शॉर्टर व्हर्जन असलेल्या ' प्रीमिअर फुत्सल लीग'चा विराट कोहली ब्रँड अँम्बेसडेर असून त्याच लीगचे ' अँथम' रिलीज झाले असून त्यामध्ये रेहमान व विराट एकत्र दिसत आहेत. या व्हिडीओद्वारे विराट एक प्रोफेशनल गायक म्हणून समोर येत असून ए.आर.रेहमानच्या मार्गदर्शनाखाली विराटचे रेकॉर्ड झालेले गाणंही आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
या प्रीमिअर लीगच्या अधिकृत अँथमचा काही भाग विराटच्या आवाज स्वरबद्ध करण्यात आला असून हे गाणं बनवलं आहे दस्तुरखुद्द ए.आर.रेहमान यांनीच... ‘नाम है फुत्सल..’ असे या अँथमचे बोल असून या व्हिडीओचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. त्यामध्ये विराट त्याच्या कूल शैलीत नाचताना आणि रॅप साँग म्हणताना दिसणार आहे. 
 
 
 

Web Title: A.R. Controversy over Rehman with Virat