शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग ठाकूर होणार बिगबॉस?

By admin | Updated: May 19, 2016 05:19 IST

शशांक मनोहर यांच्यानंतर कोण? अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

सचिन कोरडे,

पणजी- शशांक मनोहर यांच्यानंतर कोण? अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. मनोहर यांच्या राजीनाम्यानंतर बऱ्याच जणांची नावे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी आघाडीवर होती. मात्र, राज्य संघटनांचे ‘मतैक्य’ मिळविणाऱ्या अस्सल राजकारणी नेत्यालाच अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशचे खासदार अनुराग ठाकूर हेच बीसीसीआयचे नवे बिग बॉस होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या रविवारी (दि. २२) मुंबईत बीसीसीआयची बैठक होत आहे. या बैठकीत ठाकूर यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.ठाकूर यांच्यानंतर सचिवपदही रिक्त होईल. त्यामुळे त्यांच्या जागी अजय शिर्के यांचे नाव अधिक चर्चेत आहे. अनुराग ठाकूर यांना पूर्व विभागातील सहाही संघटनांचा पाठिंबा आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी इतर संघटनांची ‘मने’ जिंकली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेच अध्यक्षपद असेल, असे गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव विनोद फडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. फडके म्हणाले, ‘जेव्हापासून ठाकूर यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली, तेव्हा त्यांनी विविध संघटनांमध्ये ‘आधुनिक’ बदल घडवून आणले. साधनसुविधा उभ्या करण्यास मदत केली. क्रिकेटच्या विकासासाठी ठाकूर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळे गोव्यासह इतर राज्य संघटनाही त्यांच्याच बाजूने खंबीरपणे उभ्या आहेत. बीसीसीआयची मुंबईत विशेष सभा होत आहे. त्यांना २२ संघटनांचा पाठिंबा आहे. याच जोरावर ते बिनविरोध निवडले जातील,’ असा विश्वास फडके यांनी व्यक्त केला.दुसरीकडे, ठाकूर यांच्यानंतर सचिवपदी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शिर्के यांचे नाव आघाडीवर आहे. आपण पदासाठी काम करीत नसल्याचे शिर्के यांनी स्पष्ट केले होते. मात्र, शिर्के यांना या पदासाठी अधिक दावेदार मानले जात आहे. श्रीनिवासन यांची स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे हकालपट्टी करण्यात आली होती. तेव्हापासून २०१३ पासून खजिनदार म्हणून शिर्के यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. ठाकूर यांना बंगालसह झारखंड, ओडिशा, कोलकाता, आसाम आणि त्रिपुरा संघटनांचा भक्कम पाठिंबा आहे. >निवडणुकीला सुप्रीम कोर्टात आव्हाननवी दिल्ली : येत्या २२ मे रोजी होणाऱ्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या निवडणुकीला क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारने(सीएबी) बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ज्यांच्यावर आरोपपत्र दाखल आहेत त्यांना निवडणुकीतील सहभागापासून रोखणे तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीस स्थगिती देण्याची विनंती सीएबीने याचिकेत केली. न्या. ए. एम. सप्रे आणि न्या. अशोक भूषण या सुटीकालीन पीठापुढे ही याचिका दाखल करण्यात आली. पण या प्रकरणी आधीच पूर्णकालीन पीठापुढे सुनावणी सुरू असल्याने आम्ही यावर विचार करण्यास असमर्थ असल्याचे सांगून सुनावणीस नकार दिला. तसेच, सीएबीच्या वकीलाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणीही यावेळी केली.