शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅना इवानोव Vs मिला झार्कोविच

By admin | Updated: October 11, 2014 04:34 IST

आजच्या अत्यंत प्रगत अशा टेक्नॉलॉजीच्या काळात बुद्धिबळ खेळाची व्याख्या काहीशी बदलत चालल्याचा भास बऱ्याचदा होत असतो

आजच्या अत्यंत प्रगत अशा टेक्नॉलॉजीच्या काळात बुद्धिबळ खेळाची व्याख्या काहीशी बदलत चालल्याचा भास बऱ्याचदा होत असतो. मात्र, तंत्रज्ञान प्रगत झाले नव्हते तेव्हा खेळाडूंना खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी मुख्यत्वेकरून कल्पनाशक्तीवर जास्त भर द्यावा लागत असे. तेव्हा या खेळाचे स्वरूप वेगळेच होते. प्रत्येक खेळाडूचे मूल्यमापन हे त्याच्या कल्पनाशक्तीवर केले जात असे. विशेष करून, जुने आणि दिग्गज खेळाडू पॉल मॉर्फी, मिखाईल ताल यांची लोकप्रियता आजही कायम असण्याचे कारण म्हणजे, त्यांनी अशक्य वाटणारे मिळवलेले विजय व त्यातली कल्पकता!हे आठवण्याचे कारण म्हणजे, आज मुलींच्या गटात वूमन इंटरनॅशनल मास्टर अ‍ॅना इवानोव आणि वूमन फिडे मास्टर मिला झोर्कोविच यांच्यात खेळला गेलेला डाव. हा डाव केवळ आजचाच सर्वोत्तम न ठरता या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या डावांपैकी सर्वोत्तम ठरणारा आहे. इवानोवने राजाच्या समोरच्या प्याद्याने सुरुवात केली आणि त्याला झार्कोविचने सिसिलियन बचावातल्या पॉल्सेन प्रकाराने उत्तर दिले. ८व्या चालीत इवानोवने पटाच्या मध्यभागी असलेल्या घोड्याचा बळी दिला. वर-वर पाहता घोडा मारण्यात झार्कोविचसाठी कुठलाही धोका दिसत नव्हता. पण घोडा खाल्ल्यानंतर केवळ २-३ चाली होत नाही, तोच समोर काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना तिला आली असावी. इथून पुढचा डाव म्हणजे इवानोवच्या प्रगल्भतेची कमाल होती. झार्कोविचचा राजा पटाच्या मध्ये अडकवून तिच्या कुठल्याही मोहऱ्याला बाहेर पडायची संधीच इवानोवने दिली नाही. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ अशी झार्कोविचची अवस्था झाली होती. २२व्या चालीत इवानोवने हत्तीचा बळी देऊ केला, परंतु झार्कोविचने हे बलिदान न स्वीकारता झुंज देण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. अखेर २८व्या चालीत तिने पराभव मान्य केला कारण ‘चेकमेट’ची नामुष्की ओढवली होती! संपूर्ण डावात एकटी इवानोवच खेळत होती, असे वाटत होते. आजचा विजय तिचे मनोबल वाढवणारा आणि प्रतिस्पर्ध्यांना तिची दखल घ्यायला लावणारा आहे.(लेखक ‘फिडे’चे मान्यताप्राप्त प्रशिक्षक आहेत)