शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिप नेमबाजीत अंकुर मित्तलला डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 4:06 AM

भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने शनिवारी येथे आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले.

चांगवोन : भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने शनिवारी येथे आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले.स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. विश्वकपमध्ये अनेक पदके पटकावणाऱ्या या २६ वर्षीय नेमबाजाने १५० पैकी १४० नेम अचूक लगावले. त्यानंतर सुवर्णपदकासाठी शूटआॅफमध्ये त्याची लढत चीनच्या यियांग यांग व स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रेजेजसोबत झाली. शूटआॅफमध्ये मित्तलने चीनच्या नेमबाजाचा ४-३ ने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. आंद्रेजेजला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अंकुरने त्यासोबत सांघिक स्पर्धेत मोहम्मद असाब व शार्दुल विहानच्या साथीने कांस्यपदक पटकावले. तिन्ही नेमबाजांनी एकूण ४०९ चा स्कोअर नोंदवला. सुवर्णपदकविजेत्या इटली संघाच्या तुलनेत हा स्कोअर दोनने कमी होता. चीनने ४१० च्या स्कोअरसह रौप्यपदक पटकावले.दिवसातील अन्य स्पर्धांमध्ये दोन भारतीय महिला नेमबाज थोड्या फरकाने आपापल्या इव्हेंटमध्ये अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्या.१० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदकासह २०२० आॅलिम्पिक कोटा निश्चित करणारी अंजुम मुदगिल महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पात्रता फेरीत ११७० च्या स्कोअरसह नवव्या स्थानी राहिली. अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. अंजुम आणि आठव्या स्थानावरील स्वित्झर्लंडची नीना क्रिस्टेन यांचा स्कोअर समान होता, पण नीनाने इनर १० चे ६६ नेम लगावले होते, तर अंजुमने ५६ ने इनर १० चे लगावले होते. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत मनू भाकर ५८४ अंकांसह पात्रता फेरीत १० व्या स्थानी राहिली. रॅपिड फायरच्या दुसºया पात्रता फेरीनंतर चार नेमबाज याच स्कोअरसह बरोबरीत होते, त्यात मनू व्यतिरिक्त सिंगापूरची शीऊ होंग तेह, कतारची अल्दाना साद अलमुबारक, आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियन (१० मीटर पिस्तुल) अन्ना कोराक्की यांचा समावेश होता. शिऊ व अलमुबारक यांनी अनुक्रमे २२ व २१ इनर १० चा स्कोअर नोंदवित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली तर अन्ना व अंजुम यांचे अनुक्रमे १९ व १६ इनर १० होते.ज्युनिअर मिश्र दुहेरी ट्रॅपमध्ये मनीषा किर आणि मानवादित्य सिंग राठोड यांनी पात्रता फेरीत १३९ च्या स्कोअरसह दुसरे स्थान पटकावित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. फायनलमध्ये २४ अंकांसह त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. इटलीच्या ईरिका सेस्सा व लोरेंजो फरारी यांनी विक्रमी ४२ अंकांसह सुवर्णपदकाचा मान मिळवला.स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या खात्यात ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्यपदकांसह एकूण २० पदकांची नोंद आहे. भारत तालिकेत कोरिया व चीननंतर तिसºया स्थानी आहे. चीन दुसºया स्थानावर आहे.भारताने विश्वचॅम्पियनशिपच्या माध्यमातून आॅलिम्पिकसाठी दोन कोटा स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. (वृत्तसंस्था)