आनंदने बिलबाओ मास्टर्समध्ये वेस्ली सो याच्याविरुद्ध ड्रॉ खेळला

By Admin | Updated: November 2, 2015 00:15 IST2015-11-02T00:15:30+5:302015-11-02T00:15:30+5:30

विद्यमान चॅम्पियन आनंदने बिलबाओ मास्टर्स फायनल बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याविरुद्ध ड्रॉ खेळला.

Anand played the draw against Wesley Sole in Bilbao Masters | आनंदने बिलबाओ मास्टर्समध्ये वेस्ली सो याच्याविरुद्ध ड्रॉ खेळला

आनंदने बिलबाओ मास्टर्समध्ये वेस्ली सो याच्याविरुद्ध ड्रॉ खेळला

बिलबाओ : विद्यमान चॅम्पियन आनंदने बिलबाओ मास्टर्स फायनल बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याविरुद्ध ड्रॉ खेळला. त्यामुळे भारताच्या या दिग्गज खेळाडूला त्याचे विजेतेपद कायम ठेवण्याच्या आशेला आज जोरदार धक्का बसला.
याआधी नेदरलँडच्या अनीस गिरी याच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर आनंदने विजयासाठी खूप प्रयत्न केले; परंतु तो वेस्ली याचा मजबूत बचाव भेदू शकला नाही. वेस्ली आणि गिरी संयुक्तपणे आघाडीवर आहेत. अन्य लढतीत गिरीने चीनच्या लिरेन डिंग याला बरोबरीत रोखले. आता फक्त एक फेरीचा खेळ बाकी आहे आणि गिरी व वेस्ली प्रत्येकी सात गुणांसह अव्वल स्थानावर आहेत, तर आनंद आणि डिंग हे दोघेही प्रत्येकी ४ गुणांवर आहेत. त्यामुळे आनंद आता विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे.

Web Title: Anand played the draw against Wesley Sole in Bilbao Masters